Sharvari Wagh : कतरीना, माधुरी अन् श्रीदेवीमुळे शर्वरीला डान्सची आवड, आता आलियासोबत करणार स्क्रीन शेअर
Sharvari Wagh : गॉर्जियस बॉलीवूड स्टार शर्वरीने (Sharvari Wagh) 2024 मध्ये बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. तिने वर्षाची सुरुवातच 100 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुंज्या’ने (Munjya) केली. या चित्रपटात शर्वरी ‘तरस’ या गाण्यावर थिरकली होती. हे गाणं वर्षातील सर्वात मोठ्या म्यूझिकल हिट्सपैकी एक ठरलं. त्यानंतर तिने ‘महाराज’ सोबत ग्लोबल स्टीमिंग हिंट दिला. तर ‘वेदा’मधील तिच्या शानदार अभिनयासाठी तिला सर्वत्र प्रशंसा मिळाली. दरम्यान, आता तिने मोठ्या ऍक्शन एंटरटेनर ‘अल्फा’साठी करार केलाय, जी YRF स्पाय युनिव्हर्स फिल्म असणार आहे. यामध्ये शर्वरी सुपरस्टार आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) दिसणार आहे.
बदलापूर पुन्हा हादरलं! ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकामध्ये गोळीबार, एकजण जखमी…
शर्वरीने आपल्या उत्तम अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. शर्वरीचं जितकं अभिनयावर प्रेम आहे, तितकचं किंबहुना त्यापेक्षा अधिक तिचं नृत्य कलेवर प्रेम आहे. ‘तरस’ मधील तिच्या शानदार परफॉर्मन्सने सर्वांना चकीत केलं होतं. तिच्या करिअरच्या सुरुवातीला इतक्या मोठ्या डान्स नंबरची संधी मिळणे खरोखरच प्रशंसनीय आहे.
शर्वरीचा नृत्याशी असलेला प्रवास कॅमेरा रोल होण्यापूर्वीच सुरू झाला होता. याबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, “संगीत सुरू होताच मी लगेच नाचायला लागते. हे माझं लहानपणापासूनच आहे. मोठी होत असताना, मी एक सुपर फिल्मी मुलगी बनली होती आणि स्वतःला एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणून कल्पना करत होते, शिफॉन साडी घालून मोहरीच्या शेतात धावताना आणि हिंदी चित्रपटांच्या सुंदर गाण्यांवर नाचताना दिसत होती.”
Video : इंडिगो फ्लाईटमध्ये पायलटकडून चक्क हिंदीतून घोषणा; नेमकं काय म्हणाला?
शर्वरीने पुढे सांगितले, “माझ्यासाठी या व्यवसायाचा मी आविष्कार केला आहे आणि निश्चितच ‘तरस’ सारखा मोठा डान्स नंबर मिळवण्याचे स्वप्न पाहिले आहे. जेव्हा निर्माता दिनेश विजन सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या डान्स सॉंगसाठी निवडले तेव्हा मला खूप आनंद झाला. ‘तरस’चे शूटिंग करताना मी शंभर टक्के जीव ओतून कां केलं. स्वत:ला सिध्द करण्यासाठी ही माझ्यासाठी मोठी संधी होती आणि यात मी कोणतीही कसर ठेवली नाही.”
शर्वरीच्या समर्पणाची आणि जीव ओतून काम करण्याची झलक ‘तरस’ गाण्यात स्पष्टपणे दिसून येते. याबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, “मी दररोज स्टेप्सचा सराव केला आणि मला आनंद आहे की लोकांना ते आवडले. जेव्हा मी थिएटर्समध्ये लोकांना माझ्या गाण्यावर नाचताना पाहिले तेव्हा ती माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. मला आशा आहे की, मी माझ्या अभिनय, डांन्समुळे लोकांचे मनोरंजन करत राहीन. मला बॉलिवूडच्या अग्रगण्य अभिनेत्रींकडून खूप प्रेरणा मिळते, ज्यांनी त्यांच्या डान्सने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. माधुरी दीक्षित, रवीना टंडन, श्रीदेवी, करिश्मा कपूर, करीना कपूर, कतरीना कैफ हा अभिनेत्री माझ्यासाठी नृत्याच्या प्रेरणा आहेत.”