शर्वरीने दिला जबरदस्त मंडे मोटिवेशन, 7 महिन्यांच्या बॉक्सिंग तयारीच्या प्रवासाबाबत केला खुलासा

शर्वरीने दिला जबरदस्त मंडे मोटिवेशन, 7 महिन्यांच्या बॉक्सिंग तयारीच्या प्रवासाबाबत केला खुलासा

Sharvari Wagh: बॉलीवूडची (Bollywood) स्टार शर्वरीला (Sharvari Wagh) तिच्या अलीकडील ‘वेदा’ (Vedaa Movie) चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळत आहे. चित्रपटाच्या रिलीजनंतर काहीच दिवसांनी शर्वरीने सोशल मीडियावर (social media) एक तुफान व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिने तिच्या बॉक्सिंगच्या तयारीचा प्रवास दाखवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)


शर्वरीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करताना सांगितले आहे की, ‘7 महिन्यांची बॉक्सिंग तयारी. आठवड्यातून 6 दिवस 2 तास रोज. असंख्य मसल पुल्स. रिहॅब. पुन्हा परत कामावर… कोणताही शॉर्टकट नाही, अशी पोस्ट अभिनेत्रीने केली आहे. शर्वरीची मेहनत आणि समर्पण हे तिच्या करिअरमधील एक महत्वाचा टप्पा आहे, कारण ती ‘अल्फा’ या आगामी चित्रपटाचीही तयारी करत आहे. या चित्रपटात ती आलिया भट्टसोबत दिसणार आहे. YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा हा भाग असून, तो आपल्या दमदार ऍक्शन आणि कथेसाठी ओळखला जातो. शर्वरीच करिअर वेगाने पुढे जात आहे, आणि ती भारताची पुढील मोठी ऍक्शन स्टार बनण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

शर्वरी वाघ ही मुंज्या सिनेमात दिसली होती. तिच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक देखील झाले आहेत. त्यानंतर तिच्या झोळीत एकापेक्षा एक चित्रपट आहेत. ज्यामध्ये अल्फा, वेदा असे चित्रपट असणार आहेत.

Sharvari Wagh : ‘वेदाः’ला मिळालेल्या प्रेमामुळे रोमांचित, अभिनेत्रीने स्पष्ट सांगितले

शर्वरीने आपल्या फॅन्स आणि इंटरनेटवरच्या लोकांना आग्रह केला की त्यांनी कधीही सोमवारचा वर्कआउट मिस करू नये, आणि यासाठी अभिनेत्री कायम जबरदस्त फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप फिट आणि तंदुरुस्त दिसत आहे!

शर्वरी लवकरच निखिल आडवाणीच्या बहुप्रतीक्षित ‘वेदा’ आणि मग आदित्य चोपडा यांच्या ‘अल्फा’मध्ये दिसणार आहे. ‘अल्फा’चे दिग्दर्शन YRF चे तरुण आणि प्रशंसित दिग्दर्शक शिव रवैल करत आहेत, ज्यांनी ‘द रेल्वे मेन’मुळे ख्याती मिळवली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube