Sharvari Wagh : ‘वेदाः’ला मिळालेल्या प्रेमामुळे रोमांचित’, अभिनेत्रीने स्पष्ट सांगितले

Sharvari Wagh : ‘वेदाः’ला मिळालेल्या प्रेमामुळे रोमांचित’, अभिनेत्रीने स्पष्ट सांगितले

Sharvari Wagh Vedaa Movies: अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हे नाव सध्या सगळीकडेच जोरदार चर्चेत आलं आहे. एकीकडे तिचा ‘मुंज्या’ हा चित्रपट गाजत आहे. तर, दुसरीकडे तिच्या ‘महाराज’मधील पाहुण्या भूमिकेने देखील सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. तिने आता आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत. आता शर्वरीला ‘वेदा’ मधील (Vedaa Movies) अभिनयासाठी सर्वांगीण प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे. तिच्या उत्कृष्ट आणि दमदार परफॉर्मन्सची भरभरून प्रशंसा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)


शर्वरी स्पष्ट सांगितले आहे की, ‘2024 हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात चांगले वर्ष ठरले आहे. ‘वेदाः’ साठी मिळालेल्या सर्वसंमतीत प्रेमामुळे आणि प्रशंसेमुळे मी अत्यंत रोमांचित आहे. मी या इंडस्ट्रीत एका मोठ्या महत्वाकांक्षेसह आले आहे आणि ‘वेदाः’ ने मला माझे अभिनय कौशल्य आणि परफॉर्मन्स दाखवण्यासाठी आजवरचे सर्वोत्तम व्यासपीठ दिले आहे. माझ्या दिग्दर्शक निखिल अडवाणी यांचे मी आभार मानू इच्छिते, ज्यांनी माझ्या कारकिर्दीत मला दिशा दिली आणि मला ‘वेदाः’ म्हणून पडद्यावर साकारण्यासाठी निवडले आणि तयार केले. माझे यश हे त्यांचे यश आहे.

ती पुढे म्हणते, “मी त्यांच्या, जॉन अब्राहम, मधु आणि मोनीषा मॅम यांच्या, अभिषेक बनर्जी आणि ‘वेदाः’ च्या संपूर्ण टीमसाठी खूप आनंदी आहे की त्यांना एवढे प्रेम मिळत आहे. माझ्यासाठी प्रत्येक चित्रपट महत्वाचा आहे कारण मला प्रत्येक चित्रपटात चांगले काम करायचे आहे जेणेकरून मला अधिक चांगले काम मिळेल.

Vedaa Movie: वेदाच्या रोमँटिक ट्रॅकमध्ये जॉन अब्राहम आणि तमन्ना भाटियाची रोमँटिक केमिस्ट्री दिसणार

शर्वरी आपल्या कामाबद्दल मीडियाचे सतत समर्थन केल्याबद्दल धन्यवाद देते. ती म्हणते, “’वेदाः’ मधील माझ्या परफॉर्मन्सला मिळत असलेल्या प्रेमामुळे मला नक्कीच आणखी अद्भुत काम मिळेल. मी मीडियाचे आभार मानू इच्छिते की त्यांनी नेहमीच माझी काळजी घेतली आहे आणि मला आनंद आहे की ते पुन्हा एकदा ‘वेदाः’ मधील माझ्या परफॉर्मन्ससाठी एवढे प्रेम व्यक्त करत आहेत.”

ती पुढे म्हणते, या खडतर इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी मीडियाची भूमिका खूप महत्वाची असते. त्यामुळे त्यांचे मन जिंकणे, त्यांचा आदर मिळवणे खूप गरजेचे आहे. मला आशा आहे की ‘वेदाः’ एक मोठी यशोगाथा बनेल. हा एक मनापासून बनवलेला चित्रपट आहे ज्यात खूप मेहनत घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube