Video : इंडिगो फ्लाईटमध्ये पायलटकडून चक्क हिंदीतून घोषणा; नेमकं काय म्हणाला?

Video : इंडिगो फ्लाईटमध्ये पायलटकडून चक्क हिंदीतून घोषणा; नेमकं काय म्हणाला?

Captain Pradeep Krishnan : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंडिगोच्या फ्लाईटमधील (Indigo Flight) पायलटचा आहे. या व्हिडिओमध्ये पायलट चक्क हिंदी भाषेतून संभाषण करीत आहे. त्याचं झालं असं की, एका प्रवाशाने हिंदीतून घोषणा देण्याची त्याला विनंती केली, त्यानंतर या पायलटने थेट हिंदीतूनच घोषणा दिलीयं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, कृष्णन यांनी हा व्हिडिओ शेअर करीत असताना कॅप्शनमध्ये लिहिले, एका प्रवाशाने मला हिंदीतून घोषणा करण्यासाठी सांगितले, मी खरा प्रयत्न केला असल्याचं म्हटलंय.

इंडिगो प्लाईटमधील पायलट कॅप्टन प्रदीप कृष्णन (Captain Pradeep Krishnan) चेन्नईहून मुंबईला उड्डाण करत असताना एका प्रवाशाने त्यांना हिंदीतून घोषणा करण्याची विनंती केली. त्यानंतर कृष्णन माईकमध्ये म्हणाले, नमस्कार, माझे नाव प्रदीप कृष्णन आहे, आमच्या पहिल्या अधिकाऱ्याचे नाव बाला असून प्रियंका लीडचे नाव आहे. आम्ही आता चेन्नईहून मुंबईला 35, 000 फूट उंचीवर उड्डाण करणार आहोत. एकूण 1500 किलोमीटर अंतर असून कृपया तुमचा सीट बेल्ट घाला, अशी घोषणा कृष्णन यांनी हिंदीतून केलीयं.

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरण! क्षमा तोच मागतो जो चुकतो; राहुल गांधींनी जखमेवर मीठ चोळलं

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. एका युजरने म्हटले, ही सर्वाधिक गोड घोषणा असून मला चेन्नईला जाणाऱ्या प्लाईटमध्ये ऐकायला आवडेल, अशी प्रतिक्रिया दिलीयं. कॅप्टन कृष्णन यांच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत 1 .3 लक्ष व्हयुज मिळाले असून पायलटने हिंदीतून घोषणा केल्याने त्यांनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

Teacher’s Day : दरवर्षी ५ सप्टेंबरलाच का साजरा करतात शिक्षक दिन; जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

‘खूप छान प्रयत्न…’
सोशल मीडियावर या व्हिडिओवर एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा..हा छान दिसत आहे, हिंदी बोलणे सोपे नाही हिंदी ही स्वत;च खूप संपूर्ण भाषा आहे… छान प्रयत्न तर दुसरा युजर म्हणाला, यांचे हिंदी माझ्या इंग्रजी इतकेच चांगले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या