भारताचा मोठा निर्णय, बांग्लादेशातून उच्चायोग-वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना परत बोलावले

  • Written By: Published:
भारताचा मोठा निर्णय, बांग्लादेशातून उच्चायोग-वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना परत बोलावले

नवी दिल्ली : बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकराने उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासात तैनात असलेल्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना देशात परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारने एक सूचनाही जारी केली आहे.

भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमाने

बांग्लादेशातील हिंसाचारानंतर तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमानांची उड्डाणे चालवली जात आहेत. एअर इंडिया आणि इंडिगोकडून ही विशेष विमााने बांग्लादेशची राजधानी ढाका येथे चालवली जात असून, बुधवारी सकाळी सहा मुलांसह 205 जणांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आहे. तर, इंडिगोनेही एक निवेदनही जारी केले. ज्यात A321 निओ विमानाने मंगळवारी रात्री ढाका येथून भारतीयांना सुखरूप परत आणल्याचे म्हटले आहे.

बुधवारपासून ढाकासाठी उड्डाणे सुरू होणार
बांग्लादेशात उफळलेल्या हिंसाचारानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतातून बांग्लादेशात जाणाऱ्या ट्रेन आणि विमानसेवा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता आजपासून एअर इंडिया आणि अन्य काही विमान कंपन्यांनी ही सेवा पुन्हा कार्यान्वित केली असून, बुधवारपासून दिल्ली आणि ढाकादरम्यान दोन दिवसांची उड्डाणे चालवली जाणार आहे. तर, विस्ताराकडूनही वेळापत्रकानुसार ढाक्यासाठी उड्डाणे चालवली जाणार आहेत. सरकारी नोकऱ्यांमधील काही लोकांसाठी आरक्षण व्यवस्थेविरोधात बांगलादेशात जुलैच्या मध्यापासून विद्यार्थ्यांची निदर्शने सुरू झाली. त्यानंतर या निदर्शनांनी हिंसक रूप धारण केले. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube