शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरण! क्षमा तोच मागतो जो चुकतो; राहुल गांधींनी जखमेवर मीठ चोळलं
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : क्षमा तोच मागतो जो चुकतो, पंतप्रधान मोदींनी (Pm Narendra Modi) छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम संघाच्या माणसाला दिलं, त्याने कामात भ्रष्टाचार केल्याचं म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली तरीही जखमेवर मीठ चोळल्याचं दिसून आलंय. दरम्यान, स्व. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज सांगलीत करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी बोलत होते.
पूजा खेडकरला कोर्टाचा दिलासा, तुर्तास अटकेपासून संरक्षण; ‘या’ दिवशी पुढील सुनावणी
राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चूक केली नसेल तर त्यांच्या माफी मागण्याची वेळत येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या माणसाला पुतळ्याच्या निर्मीतीचं कंत्राट दिलं असून त्याने या कामात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलायं. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफीनामा जाहीर केलायं, तरीही राहुल गांधी यांनी पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरुन जखमेवर मीठ चोळलंय. तसेच छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली खरी पण त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाची माफी मागायला हवी, असंही गांधी म्हणाले आहेत.
निवडणुकीआधी महाराष्ट्राची चांदी! ७६ हजार कोटींची गुंतवणूक अन् १२ लाख रोजगार
मोदींनी माफी मागण्याची कारणे राहुल गांधींनी सांगितली…
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलीयं. पंतप्रधान मोदींनी कोणत्या कारणास्तव माफी मागितलीयं. त्याची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यातील पहिलं कारण म्हणजे, पुतळ्याच्या निर्मितीचं कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला दिलं गेलं, माझ्याकडून चूक झाली, मी हे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला दिलं पाहिजे नव्हतं असं मोदी म्हणाले आहेत. पुतळा निर्मीतीमध्ये भ्रष्टाचार झाला हे दुसरं कारण आहे. ज्याला कंत्राट दिलं त्याने भष्टाचार केला आहे, त्याने महाराष्ट्राच्या लोकांची चोरी केली, असल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केलायं.
दरम्यान, महाराष्ट्र महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांचा आहे. महाराष्ट्राच्या लोकांच्या डीएनएमध्ये काँग्रेस असून महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचंही राहुल गांधी म्हणाले आहेत.