Salman Khan Firing Case: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिलला पहाटे 5 वाजता गोळीबार करण्यात आला. बाईकवर आलेल्या दोघांनी हा गोळीबार केल्याची माहिती समोर आलीय. गोळीबाराच्या वेळी सलमान घरातच होता. (Salman Khan Firing Case) या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असलेल्या अनमोल बिष्णोई, गोल्डी आणि रोहित गोदारा या तिघांनी स्वीकारली होती. जुन्या शत्रुत्वातून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai Police) पण लॉरेन्स बिष्णोई गँग (Lawrence Bishnoi Gang) आणि सलमान खान यांच्यामध्ये शत्रूत्व निर्माण होण्याच्या मागची नेमके कारण काय आहे, चला तर मग जाणून घेऊया.
सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर का आला?
अभिनेता सलमान खान ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शूटींग दरम्यान 1998 साली राजस्थानमधील जोधपूरला गेला होता. प्रत्यक्षदर्शी छोगाराम बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 1998 च्या रात्री एक गाडी जंगलात फिरत होती. त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीचा आवाज ऐकून अनेकांची झोपमोड झाली. त्याने छोगाराम बिष्णोई यांना उठवले. त्यांच्या राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात गोळीबाराचा मोठा आवाज ऐकायला आला. जेव्हा छोगाराम आणि त्यांच्यासोबत असलेल्या गावकर्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तिथे शहरातले काही लोक आल्याचे पाहायला मिळाले.
गावकऱ्यांना बघून सलमान आणि त्याच्यासोबतचे इतर काही कलाकार 2 काळवीटांना मारुन निघून गेले होते. तेथील गावकऱ्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. गाडीत सलमान असल्याचे त्यांना स्पष्ट लक्षात आले. या घटनेनंतर गावातील लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. या काळवीट शिकारी प्रकरणात सलमानसोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम अशा बॉलीवूड कलाकारांचाही समावेश होता. पण हे सगळे कलाकार निर्दोष असल्याचे कोर्टात सिद्ध झाले. सलमान खानची देखील या प्रकरणात जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांमधील शत्रूत्व वाढत गेले. आणि सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर आला?
सलमान या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तिथल्या कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर जोधपूरमध्येच सलमानला संपवण्याचा लॉरेन्सचा प्लॅन होता. अनेकदा सलमानच्या घराची रेकी करवून घेतली आहे. तसेच भाईजानला मारण्यासाठी हत्यारेही मागवल्याचे लॉरेन्सने सांगितले होते. त्यानंतर 2022 मध्ये सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी देखील लॉरेन्सचा मित्र गोल्डीने स्वीकारली. आणि परत काही दिवसानंतर लॉरेन्सने ईमेलद्वारे 2023 ला पुन्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच पुढे काही दिवसातच सलमान खानचे वडील सलीम खान यांना एका चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली. लॉरेन्सच्या टोळीने याअगोदर सलमानवर अनेकदा हल्ला करण्याचे प्रयत्न केले होते. या टोळीने सलमानला त्याच्या फार्म हाऊसच्या वाटेवर देखील मारण्याचा कट रचला होता.
बिष्णोई समाजात काळवीट पवित्र
चित्रीकरणादरम्यान काळवीट शिकार हत्येप्रकरणी बिष्णोईने सलमानला अनेकदा धमकी दिली. बिष्णोई समाजात काळवीट पवित्र मानले जाते.कोर्ट काय निकाल देईल तो देईल, पण आमच्यासाठी पवित्र असलेल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमानला जिवंत सोडणार नाही,’ असे बिष्णोई समाजाचे म्हणणे होते. पण सलमान खानने जर बिष्णोई समाजाची मंदिरात येऊन माफी मागितली तर त्याला आम्ही माफ करु, असे लॉरेन्सने अनेकदा सांगितले होते.
Salman Khan House Firing आरोपींना कसं ट्रेस केलं? मुंबई पोलिसांनी सांगितला A To Z घटनाक्रम
हल्ला झाल्यावर अनमोल बिष्णोईची फेसबुक पोस्ट
अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, “आज झालेला गोळीबार हा फक्त ट्रेलर होता.“सलमान खान, तुला आमची ताकद दाखविण्यासाठी हा हल्ला केला आहे. तुझ्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. यानंतर मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. ज्या दाऊद आणि छोटा शकीलला तो देव मानतोस, त्यांच्या नावे आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. बाकी जास्त काही बोलण्याची मला सवय नाही. जय श्री राम. जय भारत (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप)” अशा आशयाची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोण आहे अनमोल बिश्नोई?
बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ म्हणून अनमोलची ओळख आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, अनमोल बिश्नोई सध्या कॅलिफोर्नियामध्ये आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्यानंतर अनमोल खोट्या पासपोर्टचा आधार घेत देशाबाहेर पळून गेला होता. वर्षभरानंतर तो अझरबैजान याठिकाणी असल्याची माहिती लागली होती. मात्र तिथून देखील तो निसटला. केंद्रीय गृहखात्याने तयार केलेल्या गँगस्टर्सच्या यादीमध्ये अनमोल बिश्नोई उर्फ भानू याच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. एनआयएकडून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केलेले असून तो सध्या अमेरिकेत लपून बसला असल्याचे सांगितले जाते.
Salman Khan House Firing : पनवेलमध्ये मुक्काम अन् वांद्र्यात रेकी; गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोईहा पंजाबमधील गुंड असून त्याच्यावर अनेक खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई आणि त्याची गँग आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. लॉरेन्स बिष्णोईची तबब्ल ७०० सदस्यांची बिष्णोई गँग असल्याचं सांगितलं जातं. दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान अशा पाच राज्यांमध्ये झालेल्या अनेक हत्या आणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये या बिष्णोई गँगचं नाव गुंतलं आहे. लॉरेन्स बिष्णोई हा पंजाबच्या फझिलका जिल्ह्यातल्या अबोहर भागातील दुतारनवली गावाचा आहे. गेल्या वर्षीपासून लॉरेन्स बिष्णोई हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये एका गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे.
परंतु या सर्व कारणांमुळे सलमान खानला वाय प्लस दर्जची सिक्युरिटी देण्यात आली. तो नेहमी बुलेटप्रूफ कारने सगळीकडे जाताना पाहायला मिळतो. आता 14 एप्रिल 2024 ला झालेल्या हल्ल्यानंतर गोळीबार करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. हल्लेखोरांचा चेहरा यात स्पष्ट दिसत आहे. पोलीस आता या प्रकरणात किती वेगाने कारवाई करतात, ते पाहावे लागणार आहे.