Salman Khan House Firing आरोपींना कसं ट्रेस केलं? मुंबई पोलिसांनी सांगितला A To Z घटनाक्रम
Salman Khan House Firing Mumbai Police gives information : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ( Salman Khan ) घराबाहेर गोळीबाराची घटना ( House Firing) रविवारी घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या 48 तासांच्या आत दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्याबद्दल मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) पत्रकार परिषद घेत या आरोपींना कसं ट्रेस केलं? ए टू झेड घटनाक्रम सांगितला.
आयुष्मान खुरानानं लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेला दिली भेट, फोटो व्हायरल
यावेळी पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितलं की, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर वांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा क्राईम ब्रँचकडे सुपूर्द करण्यात आला. याच दरम्यान अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत या घटनेबद्दल लिहिलं होतं. त्यामध्ये या घटनेची काही धागेद्वारे असण्याची शक्यता होती. त्यानुसार क्राईम ब्रँचने 12 पथक तयार केली.
त्यानंतर इंटेलिजन्स वापरून आम्ही तपास सुरु केला. 2 टीम गुजरातमध्ये पाठविण्यात आल्या होत्या. एक टीम भुजमध्ये गेली. पण आरोपींकडे त्यांच्याकडे शस्त्र असल्याची शक्यता असल्याने भूज पोलिसांशी संपर्क केला. भुजच्या एसपीने टीम देऊन त्यांना दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांना गुजरातमधून आणून आज कोर्टात हजर करण्यात आले. तसेच आता त्यांना 25 एप्रिल 2024 पर्यंत 10 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिकारी लखमी गौतम यांनी दिली.
कदम-पाटील आक्रमक पण, थोरात पटोलेंचा समजावणीचा सूर; चार वक्तव्यांत दिसला सांगलीचा ‘मूड’
या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच ताब्यात घेतले गेले. हे झालं आतापर्यंतचं वास्तव. मात्र, या गोळीबाराचं प्लॅनिंग काही एका दिवसात झालेलं नाही. यासाठीही मोठी तयारी करण्यात आली होती, याचा खुलासा आता झाला आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी आणि पनवेलच्या फार्म हाऊसची शूटरने एका महिन्यापूर्वीच रेकी केली होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी काल तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरू असून अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही. मात्र या गोळीबारात वापरण्यात आलेली दुचाकी आणि पनवेलमध्ये ज्या ठिकाणी हे लोक राहत होते त्या फ्लॅटमालकाचा मागमूस पोलिसांना मिळाला आहे.