Salman Khanला डेट करण्याच्या चर्चांवर पूजा हेगडेने सोडलं मौन; सत्य सांगत म्हणाली…

Pooja Hegde On Salman Khan: भाईजान (Salman Khan) सध्या नवीन अभिनेत्रींसोबत काम करत आहे, त्यांच्याशी त्याचं नाव जोडले जात आहे. सध्या तो ‘किसी का भाई किसी की जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा देखील सध्या जोर धरत […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 14T113144.637

Salman Khan

Pooja Hegde On Salman Khan: भाईजान (Salman Khan) सध्या नवीन अभिनेत्रींसोबत काम करत आहे, त्यांच्याशी त्याचं नाव जोडले जात आहे. सध्या तो ‘किसी का भाई किसी की जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा देखील सध्या जोर धरत आहेत. अखेर पूजा हेगडेने (Pooja Hegde) भाईजानला डेट करण्याबद्दलच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) या सिनेमाच्या रिलीज होण्याअगोदरच पूजाने सांगितले आहे की, ती सिंगल आहे, तिचे करिअर हीच तिची प्राथमिकता आहे. भाईजान आणि पूजा हेगडे यांच्या डेटिंगच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाल्या आहेत. दोघांपैकी कोणीही दावे नाकारले नव्हते किंवा स्वीकारले देखील नाहीत. भाईजान पूजा हेगडेचा भाऊ ऋषभ हेगडे याच्या लग्नाला मंगळूरला गेल्यावर या चर्चाना आणखीच जोर धरले होते.


या लग्नातील काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भाईजानला डेट करण्याच्या चर्चांबद्दल विचारले असता पूजा हेगडेने या सर्व अफवा फेटाळून लावले आहे. ती एका दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे की, “मी माझ्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर वाचत असते. पण मी सिंगल आहे, आणि मला सिंगल राहणं आवडतं. मी सध्या माझ्या करिअरवर मनापासून फोकस करत आहे.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

कामानिमित्त मी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाण्याचे प्रयत्न करत आहे, हेच माझे सध्याचे ध्येय आहे. मी आता या अफवांबद्दल प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ या फरहाद सामजी दिग्दर्शित चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम यांच्याही भूमिका आहेत.

 

Exit mobile version