मिर्झापूरचा ‘भौकाल’ आता थिएटरमध्ये! ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर रिलीज

‘मिर्झापूर: द मूव्ही’ चा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून रिलीज होताच त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Untitled Design (29)

Untitled Design (29)

Powerful teaser of ‘Mirzapur: The Movie’ released : ओटीटी विश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेली Mirzapur ही वेब सिरीज आता मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून रिलीज होताच त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सत्ता, सूड, रक्तरंजित संघर्ष आणि ‘भौकाल’ यांचा तडका पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे या टीझरमधून स्पष्ट झाले आहे.

टीझरची सुरुवातच मिर्झापूरच्या गादीसाठी सुरू असलेल्या संघर्षाच्या वातावरणातून होते. यामध्ये कालीन भैय्या, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैय्या या लोकप्रिय पात्रांची दमदार झलक दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांचा लाडका मुन्ना भैय्या पुन्हा एकदा परतताना दिसत असल्याने प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मिर्झापूरच्या सत्तेसाठी सुरू असलेली चुरस, जुन्या वैराचे नव्या संघर्षात रूपांतर आणि गादीवर कब्जा मिळवण्यासाठी सुरू असलेला रक्तरंजित खेळ याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

चित्रपटात Pankaj Tripathi पुन्हा एकदा कालीन भैय्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर Ali Fazal गुड्डू पंडितची भूमिका साकारत आहेत. याशिवाय Divyenndu Sharma मुन्ना भैय्याच्या भूमिकेत पुनरागमन करत असल्याचे टीझरमधून स्पष्ट झाले आहे. तसेच Ravi Kishan, Jitendra Kumar, Shriya Pilgaonkar आणि Shweta Tripathi यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात असणार आहेत. विशेषतः रवि किशन यांची झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

लाजा वाटल्या पाहिजे भडव्यांना; उशीरा चपाती दिल्याने साई प्रसादालयात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राडा !

‘मिर्झापूर’ वेब सिरीजने भारतीय ओटीटी विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यातील पात्रे लोकप्रिय संस्कृतीचा भाग बनली. त्यामुळे या कथेला चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची अनेक दिवसांची इच्छा होती. निर्मात्यांनी यापूर्वी चित्रपटातील प्रमुख पात्रांचे फर्स्ट लूक पोस्टर्स प्रदर्शित करून उत्सुकता वाढवली होती. आता टीझर रिलीज झाल्यानंतर ही उत्सुकता आणखी वाढली आहे. सत्ता, सूड आणि संघर्षाची ही कथा मोठ्या पडद्यावर कशी उलगडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुरमीत सिंह दिग्दर्शित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मिर्झापूरचा ‘भौकाल’ आता ओटीटीपुरता मर्यादित न राहता थेट थिएटरमध्ये पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Exit mobile version