लाजा वाटल्या पाहिजे भ XXXव्यांना; उशीरा चपाती दिल्याने साई प्रसादालयात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राडा !
Sai sansthan- या प्रकरणी श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालयात नोकरी करणारे जगन्नाथ सिताराम मुंढे यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली.
Sai sansthan : श्रध्दा व सबुरीचा मंत्र देणाऱ्या श्रीसाई बाबांच्या शिर्डीतील (Shirdi) संस्थानच्या प्रसादालयात दररोज हजारो भाविक जेवण करतात. परंतु चपाती उशीरा दिल्याच्या कारणातून उद्धव बाळसाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याने राडा केला आहे. अखेर या पदाधिकाऱ्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
14.70 कोटींचा निधी, खर्च फक्त 65 लाख! खासदार धैर्यशील मानेंच्या कामगिरीचा अहवाल समोर
ठाकरे गटाचे कोपरगावचे तालुकाध्यक्ष भरत मोरे हे काही जणांसह शिर्डीतील प्रसादालयात मंगळवारी दुपारी जेवायला गेले होते. जेवण करत असताना संस्थानच्या कर्मचाऱ्याकडून मोरे यांना चपाती देण्यास काहीसा उशीरा केला. त्यामुळे भरत मोरे हे चिडले. जेवण करत असताना अचानक मोठ-मोठ्याने ओरडून मला चपाती उशीरा का दिली ? येथे मुजोर लोक आहेत ! लाजा वाटल्या पाहिजे XXX ! बेशिस्त कर्मचारी मोबाईल पहात बसतात, माझे काम नाही म्हणतात असे म्हणत शिवी देवून कर्मचारी मदन मोहन सिंग यांना मारण्याचा प्रयत्न केला.
पत्रकारांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, संजय दिना पाटलांवर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
हिंदी भाषिकांना काम करुन देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करत साईबाबा संस्थानची बदनामी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालयात नोकरी करणारे जगन्नाथ सिताराम मुंढे यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर भरत मोरे (रा.कोपरगांव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२,२२१ ,३५१ (२),३५२,३५६ (२),२९२,२९६, २२४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे .
साईबाबा माफ करा; भरत मोरेंची सोशल मीडिया पोस्ट
गुन्हा दाखल झाल्यानंतरठाकरे सेनेचे कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिलीय. संस्थान भोजनालयात जेवण करत असताना मध्येच कर्मचाऱ्यांची शिफ्ट संपली असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. पण आमचे जेवण सुरू असल्यामुळे आम्हाला चपाती त्यामुळे लवकर मिळाली नाही,.. ( म्हणून शिफ्ट संपतेवेळी किमान भोजनालय काही मिनिटे बंद ठेवा, त्यामुळे जेवनाच्या ताटावर बसलेल्यांची गैरसोय होणार नाही,.)पाच ते सहा मिनिटे आम्ही वाढप्यांना आवाज दिले पण शिफ्ट संपली असल्याने कोणीही आमच्यासहीत इतर जेवणाऱ्यांकडे ढुंकूनही पाहीले नाही, एकसारखी घरी निघण्याची घाई दिसत होती,जो तो माझी शिप्ट संपली सांगू लागला,त्यात एक हिंदी भाषिक कर्मचाऱ्याला मी उठून त्याच्याजवळ जाऊन चपाती पाठवा सांगितले तर तोच माझ्यावर ओरडला की,.” माझे चपाती वाढण्याचे काम नाही,.” आणि पुन्हा मोबाईलमध्ये बघू लागला,मला भूक लागली असल्याने माझा संताप अनावर झाला, त्यामुळे साईभक्तांची जेवनारूपी प्रसादासाठीची दिसणारी हेळसांड मला सहन झाली नाही, कारण मी साईभक्त आहे, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर जगभरातील तमाम साईभक्त्तांना कशी वागणूक मिळत असणार हा विचाराही करायला नको.
मी कुठलाही आरडाओरडा केला नाही,ना कुणा कर्मचाऱ्यांना अडवले, ना त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला, याऊलट जेवणास बसलेल्या साईभक्तांनीही कर्मचाऱ्यांची हि दादागिरी पाहून कर्मचाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली…मी ताबडतोब झालेल्या प्रकाराबद्दल अर्ज केला आणि पोहोच पावती माझ्याकडे आहे, निकृष्ट दर्जाची चपाती, पापड ही साईभक्तांच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यासाठी जेवनाचा दर्जा आरोग्यदायी करावा असे अर्जात लेखी म्हंटले आहे.
फिर्यादी सोबत काल मी व्यवस्थित बोललो हे व्हिडिओत दिसत आहे,काल फिर्यादीने माझी माफी मागण्याचा प्रयत्न केला, चपाती आणि पापडाबद्दल अनेकांची तक्रार आहे पण वरीष्ठ लक्ष घालत नाही,असे फिर्यादी मला बोलत होता, कर्मचारी युनियला वरिष्ठ अधिकारी त्रास देतात असेही सांगत होता, .. सदरील प्रकार घडते वेळीचे साक्षीदारही माझ्याकडे आहे,. साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो मी खोटं बोलणार नाही,…मंग या फिर्यादीने व्हिडिओतील सत्त्यता व्हायरल झाल्यानंतर त्याची बदनामी होवु नये,साईभक्तांवर होणाऱ्या भोजनालयातील कर्मचाऱ्यांची दादागिरी जगासमोर येवू नये म्हणून माझ्यावर उशिरा नियोजनबद्ध खोटा गुन्हा दाखल केला,. तसेच निकृष्ट दर्जाची चपाती पापडाचा खुलासा जगासमोर येवू नये म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला,.माझाही कायद्यावर विश्वास आहे, म्हणून राजकीय व्देषापोटी शिर्डी संस्थान भोजनालयाचा ढिसाळ कारभार पर्सनल घेणाऱ्या खोटी फिर्याद देणाऱ्या फिर्यादी जग्गनाथ सिताराम मुंढे यांच्या विरोधात मीही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे भरत मोरे यांनी म्हटले आहे.