अयोध्येप्रमाणे शिर्डीत दान चोरी होऊ शकते? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले
Ayodhya donation theft Radhakrishna Vikhe Patil राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर मंत्री विखे पाटलांनी शिर्डीतील देणगीच्या सुरक्षेवर स्पष्टीकरण दिलं
Ayodhya donation theft just as it could occur in Shirdi Minister Radhakrishna Vikhe Patils clear answer : राम मंदिरातील देणग्या, अर्पण आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांकडे औपचारीक तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तापास सुरू केला. तपासादरम्यान आठ जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तपासातून आणखी काही आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्ती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना शिर्डीतील साईबाबा मंदिरात देणगीच्या सुरक्षेबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
नेमकं काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील?
शिर्डीतील साईबाबा मंदिरात देणगीबाबत अत्यंत पारदर्शक धोरण आहे. त्यामुळे आतापर्यंत शिर्डीतील साईबाबा मंदिरात देणगीबाबत एकही गैरव्यवहार किंवा घोटाळ्याचं प्रकरण घडलेलं नाही. शिर्डीमध्ये येणारे जे काही बाबांचे भाविक भक्त आहेत. ते जे काही दान बाबांच्या चरणी अर्पण करतात. त्याची आम्ही अत्यंत काळजी घेतो. आता देणगीचा हिशेब ठेवणे आणि ती सांभाळणे यासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्यात आलं आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही इतर प्रणाली आहेत. कारण शेवटी देणगी ही भाविकांची श्रद्धा असते तिची काळजी घेणे गरजेचे आहे.
#WATCH | Mumbai: Maharashtra minister Radhakrishna Vikhe Patil says, "The Shirdi Sai Baba Trust operates with a high level of transparency. There have been no incidents of malpractice so far. Great care is taken regarding the sanctity of the offerings made by devotees…… pic.twitter.com/CsumvEzdoo
— ANI (@ANI) July 1, 2026
देशातील प्रमुख मंदिरांपैकी एक असलेल्या शिर्डीतील साई बाबा मंदिरात देणग्यांची मोजणी कशी केली जाते?
महाराष्ट्रातील शिर्डी येथील साई बाबा मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत देणग्यांची मोजणी केली जाते. देणगी पेट्या उघडल्या जातात तेव्हा वरिष्ठ अधिकारी आणि बँकेचे प्रतिनिधी उपस्थित असतात. नोटांची मोजणी बुलेटप्रूफ काचेने संरक्षित असलेल्या एका खोलीत होते. कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे घालणे आणि आत प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्टर तपासणी करणे बंधनकारक आहे. मंदिराच्या हिशोबाचे लेखापरीक्षण एका सरकारी संस्थेद्वारे केले जाते.