पत्रकारांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, संजय दिना पाटलांवर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती त्यांनी घेतली असून खा. संजय पाटील यांच्याशी देखील थेट चर्चा केली आहे.
Chief Minister’s first reaction to the Sanjay Dina Patil controversy : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून अर्वाच्य भाषेत वक्तव्य केल्याचा आणि मारहाणीची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद थेट पावसाळी अधिवेशनात उमटले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहते. पत्रकार संघटनांनी देखील या वक्तव्याचा निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी घेतली असून खासदार संजय दिना पाटील यांच्याशी देखील थेट चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, घडलेल्या प्रकाराबाबत माझी संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी आपल्या भावना माझ्यासमोर व्यक्त केल्या आहेत. पत्रकारांबद्दल चुकीचे वक्तव्य करण्याचा किंवा त्यांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. पत्रकारांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे आणि तो कायम राहील.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या वादामागे खासदार संजय राऊत यांच्या सातत्याने होत असलेल्या वक्तव्यांचा संदर्भ दिला. संजय राऊत हे दररोज पत्रकार परिषदांमधून विरोधकांवर टीका करतात. अनेकदा ते अपशब्द वापरतात, घरात घुसून मारण्याची भाषा करतात. पत्रकारांसमोर देखील खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्ये केली जातात. या सर्व प्रकाराचा राज संजय पाटील यांच्या मनात साचलेला होता. त्यातूनच भावनेच्या भरात हे वक्तव्य झाले, असा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला.
तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हला मारून पाठवेन, शिंदेंचे खासदार संजय पाटलांची थेट पत्रकारांनाच धमकी
शिंदे यांनी पुढे सांगितले की, लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात. राजकीय संघर्ष असू शकतो. पण त्यासाठी वापरली जाणारी भाषा सभ्य असली पाहिजे. महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती ही पुरोगामी विचारांची आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने किंवा लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही. उपमुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधताना म्हटले की, 2022 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जात आहे, ती अतिशय दुर्दैवी आहे. वैचारिक विरोध असला तरी व्यक्तीगत पातळीवर जाऊन अपशब्द वापरणे, धमक्या देणे किंवा खालच्या दर्जाची भाषा करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून संजय दिना पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांना धमकी देणे आणि त्यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणे हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत राऊत यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता आता प्रशासकीय आणि कायदेशीर पातळीवरही पोहोचला आहे.
◻️Eknath Shinde LIVE📍 विधान भवन, मुंबई राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन – पत्रकारांशी संवाद https://t.co/4nykuXxzAy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2026
पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला. पत्रकारांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर सरकारची भूमिका काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. तर सत्ताधाऱ्यांनीही पत्रकारांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका मांडत संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचे समर्थन नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणी महत्त्वाचे विधान करत सांगितले की, मी स्वतः संजय दिना पाटील यांना पत्रकारांविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे सांगितले आहे.
मी चुकीचं केलं असेल तर.., राऊतांच्या लेटरबॉम्बवर संजय दिना पाटलांचं चोख उत्तर
त्यांनीही आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे हा वाद आणखी पेटला असून पत्रकार संघटना, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी नेते यांच्याकडून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. संजय दिना पाटील यांची दिलगिरी, संजय राऊत यांचे पोलीस आयुक्तांना पत्र आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता या वादावर पुढे काय कारवाई होते आणि राजकीय वातावरणात आणखी कोणत्या घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.