Download App

खिलाडी कुमार आणि प्रभासच्या आगामी चित्रपटाचा टीझर जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात होणार प्रदर्शित

Kannappa Teaser Date Release: साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि अक्षय कुमार यांचा 'कन्नप्पा' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे.

Kannappa Teaser Date Release: साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा ‘कन्नप्पा’ हा (Kannappa Movie) चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, आता त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. (Kannappa Teaser) या सिनेमाच्या टीझर रिलीजच्या तारखेबाबत एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचा टीझर जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात लाँच होणार आहे.


या चित्रपटात विष्णू मंचू मुख्य भूमिकेत असून प्रभास (Prabhas) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) कॅमिओ करताना दिसणार आहेत. ‘कन्नप्पा’ सिनेमाचे लेखक विष्णू मंचू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख उघड केली आहे. 20 मे रोजी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्राचा टीझर मोठ्या थाटात प्रदर्शित होणार आहे. विष्णूच्या या पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता अनेक पटींनी वाढली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये टीझर होणार लाँच

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना विष्णूने लिहिले आहे की, “20 मे रोजी ‘द वर्ल्ड ऑफ कन्नप्पा’ची झलक दाखवण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. तो कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लॉन्च केला जाईल.” हा चित्रपट मुकेश कुमार सिंग दिग्दर्शित करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोटोमध्ये इंडस्ट्रीतील अनेक टॉप स्टार्स दिसणार आहेत. ‘कन्नप्पा’ चित्रपटाची निर्मिती अवा एंटरटेनमेंट आणि 24 फ्रेम्स फॅक्टरी करत आहे. या चित्रपटाचे संगीत मणि शर्मा आणि स्टीफन देवासी यांनी दिले आहे.

Sonu Sood: अभिनेत्याने अनोखा फोटो शेअर केला अन् म्हणाला, ‘यासाठी खूप…’

ही गोष्ट प्रभासशी संबंधित

काही दिवसांपूर्वी विष्णू मंचू यांनी एक व्हिडिओ शेअर करताना सांगितले होते की, ‘कन्नप्पा’मध्ये अनेक सुपरस्टार दिसणार आहेत. चित्रपटाची कथा खूप दमदार असणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. प्रभासचा संदर्भ देत विष्णूने सांगितले होते की, जेव्हा त्याने एका विशिष्ट भूमिकेसाठी प्रभासशी संपर्क साधला तेव्हा त्याने चित्रपटाची संपूर्ण कथा ऐकली आणि त्याने ठरलेल्या भूमिकेव्यतिरिक्त इतर भूमिकांमध्ये रस दाखवला. अखेर प्रभासने ती भूमिका साकारली आहे ज्यात त्याला रस होता.

follow us