Download App

Box Office Collection: ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर धूम! 3 दिवसांतच पार केला 200 कोटींचा टप्पा

Salaar Box Office Collection Day 3: 2023 हे वर्ष प्रभाससाठी (Prabhas) खूप चांगले ठरले आहे. या वर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले, (Salaar Movie) त्यातील एक ‘आदिपुरुष’ फ्लॉप ठरला. यानंतर निर्मात्यांपासून ते समीक्षक आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत सर्वांच्या नजरा प्रभासच्या ‘सालार’कडे लागल्या होत्या. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमाचा बोलबाला सर्वत्र बघायला मिळाले. सालार रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत (Salaar Box Office ) आणि चित्रपटाने जगभरात तिहेरी शतक ठोकण्यात यश मिळविले आहे. (Salaar Box Office Collection) तिसर्‍या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे यश सुरूच आहे, त्यामुळे ‘सालार’ने आतापर्यंत किती कमाई केली आहे, जाणून घ्या…


प्रभासचा ‘सालार’ 22 डिसेंबर रोजी तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी 178.7 कोटी रुपयांचा परदेशात व्यवसाय केला, यासह तो 2023 मधील सर्वात मोठा भारतीय सलामीवीर ठरला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही चित्रपटाने मोठी कमाई केली. दुसऱ्या दिवशी त्याचे जगभरातील कलेक्शन 295.7 कोटी होते. यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रभासच्या अॅक्शनपटानेही 300 कोटींचा आकडा पार केला. आता ताज्या आकडेवारीनुसार 400 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ‘सालार’ने रविवारी जगभरात 325 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी, चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी, चित्रपटाला ख्रिसमसच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा मिळेल, त्यानंतर अवघ्या चार दिवसांत तो 400 कोटींचा टप्पा ओलांडू शकेल, असे बोलले जात आहे.

भारतात 200 कोटींचा टप्पा पार
‘सालार’च्या भारतीय कलेक्शनबद्दल बोललो तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी म्हणजेच तिसर्‍या दिवशी सुमारे 61 कोटींची कमाई केली आहे, त्यानंतर त्याचे भारतातील कलेक्शन 208.05 कोटींवर पोहोचले आहे. उर्वरित दोन दिवसांच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 90.7 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी 56.35 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

Gautami Patil: गौतमी पाटील बनली पोलिस ऑफिसर? वाचा काय आहे प्रकरण

प्रभासच्या ‘सालार’चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. याआधी त्याने ‘KGF’ सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा व्यवसाय केला होता. ‘सालार’च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर प्रभासशिवाय श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि टिनू आनंद यांसारखे स्टार्सही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Tags

follow us