Box Office: ‘सालार’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी रचला इतिहास; बंपर कमाईबरोबर बनवले नवे रेकॉर्ड

Box Office: ‘सालार’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी रचला इतिहास; बंपर कमाईबरोबर बनवले नवे रेकॉर्ड

Salaar Box Office Collection Day 1: प्रभासच्या (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. (Salaar Box Office Collection) ‘सालार’सोबत प्रभासने त्याच्या ‘बाहुबली’ चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला आहे. सालार: सीझ फायर – भाग 1 ने भारतात सुमारे 112 कोटी रुपये आणि जगभरात 175 कोटी रुपये जमा केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


‘सालार’च्या निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या आणि या चित्रपटाने तो खरा केला आहे. अनेक व्यापार विश्लेषकांनी असा अंदाज वर्तवला होता की हा चित्रपट पहिल्या दिवशी आश्चर्यकारक कामगिरी करेल. हा चित्रपट दक्षिणेत सर्वाधिक पाहिला गेला आहे. प्रभास स्टारर या चित्रपटाने कर्नाटकमध्ये 12 कोटी रुपये, केरळमध्ये 5 कोटी रुपये आणि तामिळनाडूमध्ये 4.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

वृत्तानुसार, चित्रपटाची 30 लाखांहून अधिक ऍडव्हान्स तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे या चित्रपटाने आधीच 95 कोटींचा व्यवसाय केला होता. Sacknilk नुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग 12.77 कोटी रुपये होती. हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरू शकतो.

‘बाहुबली’ नंतर हा चित्रपट प्रभासचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरणार आहे. प्रभासचे यापूर्वीचे ‘आदिपुरुष’, ‘साहो’ सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत. मात्र या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे आणि प्रभासचे खूप कौतुक होत आहे.

Box Office: किंग खानची जगभर चर्चा! रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी ‘डंकी’च्या कमाईत घसरण

शाहरुख खानच्या ‘डंकी’सोबत प्रभासचा ‘सालार’ रिलीज झाला. या चित्रपटाने शाहरुख खान स्टाररला ऍडव्हान्स तिकीट बुकिंगच्या बाबतीत मागे टाकले आणि आता ओपनिंग डे कलेक्शनमध्ये ‘सालार’, ‘डंकी’ला मागे टाकले आहे. डंकीने पहिल्या दिवशी जवळपास 30 कोटींचा व्यवसाय केला होता, तर चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube