Download App

Box Office: किंग खानला मागे टाकत ‘सालार’ने रचला नवा रेकॉर्ड; पाचव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Salaar Box Office Collection Day 5: प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (सलार: भाग 1- सीझफायर) (Salaar Movie) बॉक्स ऑफिसवर ( Box Office Collection) जोरदार कामगिरी करत आहे, शाहरुख खानच्या ‘डंकी’ला (Dunki Movie) मागे टाकत आहे. 22 डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.


भारतातही या चित्रपटाने 270 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्याच्या अखेरीस 500 कोटी क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.हा चित्रपट हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हिंदीसोबत तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित झाला.

सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, ‘सालार’ने पहिल्या दिवशी एकूण 90.7 कोटी रुपये कमावले होते.दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 56.35 कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 62.05 कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 45.77 कोटी रुपये होते. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पाचव्या दिवशी 23 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Happy Birthday: ‘बीइंग ह्यूमन’ म्हणायला लावणारा ‘भाईजान’ रिअल लाईफमध्ये ठरला कमनशिबी

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. हा चित्रपट त्याच्या 2014 मधील कन्नड चित्रपट Ugramm वर आधारित आहे. ‘सालार’ ही कथा आहे दोन बालपणीच्या मित्रांची, जे एकमेकांचे शत्रू होतात. प्रभास देवाची भूमिका साकारत आहे तर पृथ्वीराज वरदराज मन्नारची भूमिका साकारत आहे.चित्रपटात जगपती बाबू, बॉबी सिम्हा, श्रिया रेड्डी आणि इतरही प्रमुख भूमिकेत आहेत.

‘बाहुबली’ नंतर प्रभासचा हा पहिलाच चित्रपट आहे जो इतकी कमाई करत आहे. या वर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट निराशाजनक ठरला. हा चित्रपट त्याच्या वादग्रस्त संवादांमुळे वादात सापडला होता. मात्र, ‘सालार’ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय.

Tags

follow us