Happy Birthday: ‘बीइंग ह्यूमन’ म्हणायला लावणारा ‘भाईजान’ रिअल लाईफमध्ये ठरला कमनशिबी

Happy Birthday: ‘बीइंग ह्यूमन’ म्हणायला लावणारा ‘भाईजान’ रिअल लाईफमध्ये ठरला कमनशिबी

Happy Birthday Salman Khan: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) 27 डिसेंबरला त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Salman Khan Birthday) सध्या सलमान खान त्याच्या ‘टायगर 3’ आणि ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) या जोरदार चर्चेत आहे. सलमान खानने त्याच्या कारकिर्दीत बराच पल्ला गाठला आहे, पण वैयक्तिक आयुष्यात तो अजूनही मागे आहे. ‘बीइंग ह्यूमन’ म्हणायला लावणारा ‘भाईजान’ मात्र रिअल लाईफमध्ये कमनशिबी ठरला आहे. या वयातही सलमान खानने लग्न केलेले नाही. यामुळे प्रत्येकजण त्याच्या लग्नाची काळजी करत आहे आणि त्याला कायम विचारत असतात ‘तुझे लग्न कधी होणार?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव
एका मुलाखतीत सलमान खान म्हणाला होता की, लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे, यामध्ये लाखो- करोडो रुपये खर्च होतात. सलमानने सांगितले की, तो हा खर्च करू शकत नाही, त्यामुळे तो लग्न करत नाही. ‘सुलतान’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमान खानने लग्नाच्या बाबतीत मोठा खुलासा केला होता.

सलमान खान पुढे म्हणाला की, तो लग्नासाठी बेताब आहे, पण तो समोरच्याच्या हो ची वाट पाहतो. लग्न करणे ही पुरुषाची नाही तर स्त्रीची इच्छा असते. सलमान खानने एक-दोन नव्हे तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. सलमान खानने पहिल्यांदा सोमी अलीला डेट केले होते. सोमी एक अमेरिकन-भारतीय अभिनेत्री आहे, तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमान आणि सोमी दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते पण दोघांनीही लग्न केले नाही.

Year Ender: 2023 ‘या’ वर्षात मराठी सेलिब्रिटींचा मोठ्या थाटात पार पडला लग्नसोहळा

सोमी अलीनंतर सलमान खानने अभिनेत्री संगीत बिजलानीला डेट केले. त्यांच्या देखील नात्याची बरीच चर्चा झाली होती. आजही सलमान हा संगीताचा चांगला मित्र आहे. पुढे सलमान खानच्या अफेअरची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे ऐश्वर्या रायसोबत. या दोघांचे नाते कोणापासून लपलेले नव्हते आणि त्यांच्या ब्रेकअपच्या किस्सेही जोरदार चर्चेत आहेत.

पुढे सलमान खान कतरिना कैफसोबत देखील रिलेशनशिप मध्ये होता. पण त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. सध्या सलमानचे नाव रोमानियन मॉडेल युलिया वंतूरसोबत जोडले गेले आहे. मात्र, या नात्याबाबत दोघांनीही कधीही मौन सोडलेले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube