Year Ender: 2023 ‘या’ वर्षात मराठी सेलिब्रिटींचा मोठ्या थाटात पार पडला लग्नसोहळा

Year Ender: 2023 ‘या’ वर्षात मराठी सेलिब्रिटींचा मोठ्या थाटात पार पडला लग्नसोहळा

Year Ender 2023 : नवीन वर्षाच्या आगमनासाठी आता 5 पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप (Year Ender 2023) देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होत आहोत. पण, या सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या ज्या आपल्या कायम स्मरणात राहतील. मराठी मनोरंजन क्षेत्राबद्दलच बोलायचं झालं तर या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटींचं लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. आता आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे की या वर्षात कोणत्या मराठी कलाकारांनी मोठ्या थाटात लग्नसोहळा केले आहे.

Mugdha and Prathamesh: मुग्धा आणि प्रथमेश यांनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात चिपळूणमध्ये मुग्धा-प्रथमेशचा 21 डिसेंबर रोजी विवाहसोहळा पार पडला.

Amrita Deshmukh-Prasad Javade: अमृता देशमुख-प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा 18 नोव्हेंबर रोजी थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकर व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती. अमृता-प्रसादच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

Ayodhya Ram Mandir च्या उद्घाटन सोहळ्याचं खास निमंत्रण; कोण-कोणते बॉलिवूड स्टार्स लावणार हजेरी?

Suruchi Adarkar Piyush Ranade: ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर लग्नबंधनात अडकली आहे. सुरुचीने अभिनेता पियुष रानडे याच्याशी 6 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे.

Swanandi Tikekar Ashish Kulkarni: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका स्वानंदी टिकेकर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. गायक आशिष कुलकर्णी याच्या सोबत तिने 26 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे.

Gautami Deshpande Swanand Tendulkar: अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत गौतमीने लग्नगाठ बांधली आहे.गेल्या काही दिवसांपासून गौतमी सातत्याने तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube