Download App

Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज डेट जाहीर

  • Written By: Last Updated:

Salaar Movie Poster Release: प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘सालार’ या (Salaar Movie) सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. येत्या 22 डिसेंबरला बहुप्रतिक्षित ‘सालार’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. (Social Media) गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिनेमाचा नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Salaar Movie Trailer) पोस्टरमध्ये निर्मात्यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे.


प्रभासने ‘आदिपुरुष’मध्ये प्रभु श्रीरामाचे पात्र साकारले होते. त्याचा हा बिगबजेट सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. आता चाहत्यांना ‘सालार’ मधून खूपच अपेक्षा आहेत. नुकतचं सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्यापासून चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. दिवाळीनिमित्त अभिनेत्याने फॅन्सला मोठं गिफ्ट दिले आहे. येत्या 1 डिसेंबर दिवशी सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी सालारचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. यामुळे आता प्रभासच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आल आहे.

केजीएफच्या दिग्दर्शकांनी प्रभासच्या ‘सालार’चे दिग्दर्शन केले आहे. सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये प्रभाससोबत सुकुमारन, श्रृती हासन, जगपती बाबू हे कलाकार बघायला मिळणार आहेत. प्रभासच्या ‘सालार’सोबत थिएटरमध्ये किंग खानचा ‘डंकी’ सुद्धा रिलीज होणार आहे. या दोघांमध्येही आता काटे की टक्कर होणार असल्याचे बघायला मिळणार आहे. तसेच या सिनेमात सर्वाधिक कमाई कोण करणार याची आत्तापासून जोरदार चर्चा होत आहे.

Jhimma 2 Trailer: ‘आई होणं म्हणजे, बाई… ‘; ‘झिम्मा-2’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

तसेच पृथ्वीराज सुकुमारनच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज चित्रपटाच्या निर्मात्यांनी पृथ्वीराजच्या लूकचे पोस्टर रिलीज करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये पृथ्वीराज हा नाकात रिंग, इअरिंग्स आणि गळ्यात चोकर आणि कपाळावर टिळा अशा लूकमध्ये दिसत आहे. पृथ्वीराजच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी पृथ्वीराजच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

Tags

follow us