Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, सालार’चा फर्स्ट लूक Out

Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, सालार’चा फर्स्ट लूक Out

Salaar Movie Poster Release: प्रभासच्या (Happy Birthday Prabhas) बहुप्रतीक्षित ‘सालार’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. चाहत्यांची उत्कंठा दुप्पट करण्यासाठी निर्मात्यांनी सुपरस्टार प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत (Salaar Movie Poster Out) सालार’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumit Kadel (@sumitkadelofficial)


चित्रपटाचे पोस्टरमध्ये प्रभासचा एक दोन नव्हे तर अनेक अवतारांमध्ये बघायला मिळत आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत आहे. तिच्या या अप्रतिम लूकचे चाहते मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सालार’चे ओटीटी हक्क विकले गेल्याची बातमी समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे हक्क 80 कोटी रुपयांना विकले गेले आहे. अशा परिस्थितीत प्रभासच्या या चित्रपटाने एसएस राजामौली यांच्या आरआरआरला मागे टाकले आहे. आरआरआरचे (OTT) ओटीटी अधिकार 75 कोटी रुपयांना विकले गेल्याची माहिती समोर आली.

Happy Birthday Prabhas: अभिनेता प्रभासला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर …

तसेच पृथ्वीराज सुकुमारनच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज चित्रपटाच्या निर्मात्यांनी पृथ्वीराजच्या लूकचे पोस्टर रिलीज करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये पृथ्वीराज हा नाकात रिंग, इअरिंग्स आणि गळ्यात चोकर आणि कपाळावर टिळा अशा लूकमध्ये दिसत आहे. पृथ्वीराजच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी पृथ्वीराजच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

प्रभासचे शेवटचे २ चित्रपट ‘आदिपुरुष’ आणि ‘राधे श्याम’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. अशा परिस्थितीत प्रभासला त्याच्या आगामी ‘सालार’ चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री श्रुती हासन आणि मीनाक्षी चौधरी देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘फुक्रे 3’ सोबत हा चित्रपट 28 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube