Download App

Prabhas : काळं शर्ट, लुंगी अन् बरचं काही, प्रभासच्या ‘द राजा साब’ची पहिली झलक समोर

Prabhas Raja Saab Look: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) याने त्याच्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी एक खास बातमी दिली आहे. अभिनेत्याने चाहत्यांना गुड मॉर्निंग म्हणत आपल्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोबतच त्याने आपल्या आगामी सिनेमाच्या नावाचा देखील खुलासा केला केला. मात्र, सध्या त्याच्या या सिनेमातील लूकने सोशल मीडियावर (social media) जोरदार चर्चा रंगत आहे. ‘राजा साब’ (Raja Saab Movie) असे प्रभासच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात त्याचा लूक अगदीच हटके असणार आहे.


‘डार्लिंग’ स्टार प्रभासने मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच आगामी सिनेमा ‘राजा साब’चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. एक पोस्टर शेअर करत त्याने आपल्या लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. प्रभासच्या आगामी सिनेमातील लूक प्रेक्षकांना चांगलाच साऊथचा जलवा दाखवणारा आहे. प्रभासच्या या आगामी सिनेमात एका साध्या माणसाची कथा दाखवण्यात येणार असावी, असे या फर्स्ट लूकवरून चर्चा होऊ लागली आहे. प्रभासच्या या लूकबद्दल बोलायचे तर, यात पूर्ण दाक्षिणात्य फील असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये प्रभास लुंगी स्टाईलमध्ये उचलून आपला जलवा दाखवताना दिसत आहे.

प्रभासने शेअर केलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये रस्ता आणि भरपूर फटाके दिसत आहेत. यातूनच अभिनेता वाट काढत पुढे येत आहे. यादरम्यान त्याने अगदी स्टाईलमध्ये आपली लुंगी उचलून धरली आहे. प्रभासचा हा राउडी साऊथ लूक बघून तो एखाद्या स्ट्रीट किंग टाईपची भूमिका करणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र, काळा शर्ट, लुंगी आणि फ्लिप फ्लॉप असा हा त्याचा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चा विषय बनला आहे.

बिग बीं’नी यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा!

अभिनेता प्रभासची पोस्ट शेअर होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होण्यास सुरुवात झाली. या नव्या सिनेमामुळे प्रभासच्या चाहत्यावर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रभासच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांनंतर प्रभासला या स्टाईलमध्ये बघून त्याचे चाहतेही खूप खूश झाल्याचे दिसत आहेत.

follow us