Download App

Khichadi 2 Teaser : हास्याचे फवारे उडवायला पुन्हा येणार प्रफुल्ल-हंसाची जोडी; खिचडी 2 चा टीझर रिलीज…

Khichadi 2 Teaser : लेखक दिग्दर्शक आतिश कपाडिया यांची ‘खिचडी’ ही मालिका 2002 मध्ये पहिल्यांदा टिव्हीवर आली आणि तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील दमदार ह्युमर आणि दिग्गज कलाकार या कॉम्बिनेशने हा शो प्रचंड प्रसिद्ध झाला. त्यानंतर 2010 मध्ये या मालिकेचा चित्रपट आला. त्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटाच्या सिक्वेलचा टीझर रिलीज झाला आहे. ( Prafulla Hansa pair come again for laughter comedy Khichadi 2 Teaser Out)

राहुल गांधी यांची हुजरेगिरी करण्यासाठी संजय राऊत हाजीर; संजय शिरसाट यांची बोचरी टीका

आज या चित्रपटाचा टीझर रिलीज करत घोषणा केली. यामध्ये फराह खान या 2010 ला आलेल्या खिचडी चित्रपटामध्ये कॅमिओ केला होता. त्यानंतर आता देखील फराह सुपर स्पेशल अॅपिरन्स करणार आहे. तर हंसा आणि हिमांशूचे टीपीकल जोक पुन्हा तसेच पोटधरून हसवत आहेत.

KBC 15 : अमिताभ यांच्या लूकपासून लाईफलाईनपर्यंत ‘केबीसीच्या 15’ व्या सीजनमध्ये हे बदल…

तर हा टीझर शेअर करताना निर्माते म्हणाले की, या दिवाळीला मोठ्या पडद्यावर प्रकाश टाकायला आणि तुम्हाला हसवायला येणार आहे. भारताच्या मनोरंजनाचा 2 दशकांचा वारसा असलेलं पारेख कुटुंब डबल हास्य आणि वेड घेऊन येत आहे खिचडी.

यामध्ये सुप्रिया पाठक कपूर, राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक, कीर्ति कुल्हारी आणि अभिनेते-निर्माते जमनादास मजेठिया (जेडी) यांच्या नेतृत्त्वात हा चित्रपट हास्य, भावना आणि मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

Tags

follow us