KBC 15 : अमिताभ यांच्या लूकपासून लाईफलाईनपर्यंत ‘केबीसीच्या 15’ व्या सीजनमध्ये हे बदल…

KBC 15 : अमिताभ यांच्या लूकपासून लाईफलाईनपर्यंत  ‘केबीसीच्या 15’ व्या सीजनमध्ये हे बदल…

Kaun Banega Karodpati Season 15 : अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 15 वा सीझन सोमवारी 14 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी हा कार्यक्रम आणखी खास असणार आहे. कारण यावेळी अभिताभ बच्चनच्या लूकपासून अनेक वेगवेगळे बदल पाहायाला मिळणार आहेत. यात कोण-कोणते बदल होणार आहेत हे जाणून घेऊ…(Amitabh Bachchan look what’s change in Kaun Banega Karodpati Season 15 )

बांग्लादेशचा कर्णधार ठरला! शाकिब अल हसनच्या खांद्यावर धुरा; विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व करणार

‘केबीसीच्या 15’ व्या सीजनमध्ये काय-काय बदलणार…
अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात यावेळी अनेक वेगवेगळे बदल पाहायाला मिळणार आहेत. यामध्ये निर्मात्यांनी या कार्यक्रमाचा सेट देखील बदलला आहे. यावेळी हा सेट आणखी आकर्षक आणि फ्रेश असणार आहे. एक्स या आकाराचा हा सेट आहे. तेसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कंन्टेस्टंसट्ला नवी लाईफलाईन देण्यात येणार आहे. मात्र हे अद्याप समोर आलेलं नाही की, लाईफलाईन नवी आहे. कींवा जुन्या लाईफलाईनची जागा घेणार आहे.

Pune News : चांदणी चौक खुला झाला पण, भाजपमधील वाद रंगला; मेधा कुलकर्णींनी डागली तोफ

त्याचबरोबर अभिताभ बच्चन ज्या घड्याळाला डुगडुगी जी म्हणत होते. त्यात देखील बदल केले आहेत. तर या सीजनमध्ये अभिताभ बच्चन यांच्या लूकमध्ये बदल करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांच्या स्टायलिस्ट प्रिया पाटील यांनी सांगितलं की, 15 व्या सीजनमध्ये अभिताभ बच्चन यांचा लूक नवीन आणि फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांना क्लासिक लूक देण्यासाठी जोधपूरी शॉल देखील वापरण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा 15 वा सीझन सोमवारी 14 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता सोनी टिव्ही या वाहिनीवर पाहायाला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube