Download App

International Yoga Day: प्राजक्ता माळीचा झक्कास उपक्रम; चाहत्यांना दिले सूर्यनमस्काराचे धडे

Prajakta Mali: आज २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये योगा दिन म्हणून साजरा केला जात असतो. अनेक जण स्वतःला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगाचा मार्ग अवलंबत असतात. सिने इंडस्ट्रीज सुद्धा अनेक सेलिब्रिटी योगाद्वारे आपल्या शरीराची काळजी घेत असतात. आज या योगा दिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियावर (social media) काही खास यागांचे पोज दिले आहेत.


मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे दिसून येत असते. तसेच ती या माध्यमाद्वारे आपल्या चाहत्यांना अनेक गोष्टी सांगत असते. तसेच त्यांना अनेक आव्हाने देखील देत असते. सध्या सोशल मीडियावर अनेकदा ती वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याचे देखील दिसून येत आहे. अभिनेत्रीने काल सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती.


त्यामध्ये तिने योग दिनानिमित्त इंस्टाग्रामवर (Instagram) लाईव्ह येऊन १०८ सूर्यनमस्कार घालणार असल्याचे सांगितले होते. सोबतच तिने आपल्या चाहत्यांना देखील आपल्याबरोबर सूर्यनमस्कार घालण्याचे आव्हान दिले आहे. आज योग दिवसानिमित्त सकाळी प्राजक्ताने लाइव्ह येऊन तिच्या सूर्यनमस्काराला सुरुवात केली होती. विषेश म्हणजे तिचे चाहते देखील तिच्या या अनोख्या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत.

प्राजक्ताच्या कामाविषयी सांगायचे झाले तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका करत आहे. तसेच ती इतर सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये सतत व्यस्त असते. तिने स्वत:चा अस्सल मराठमोळ्या दागिन्यांचा इमिटेशन ज्वेलरी व्यवसाय सुरु केला आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला मोठी ओळख मिळवून दिली आहे. संयुक्त राष्ट्र बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्याची मागणी सध्या होत आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

ती मागणी मान्य झाल्यावर २१ जून २०१५ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात असतो. यंदा योग दिवस साजरा करण्याचे ९ वे वर्ष आहे. नियमित योगा केल्यामुळे तुम्ही खूपच तंदुरुस्त राहणार आहात, तसेच तुम्हाला तुमच्याबरोबर असलेल्या ऊर्जेची जाणीव होते. योगामुळे अनेक आजार दूर होत असतात. तसेच शारीरिक आजारांबरोबर मानसिक आजार सुद्धा योगामुळे दूर होत असतात.

Tags

follow us