Download App

‘The Kerala Story’ सिनेमावरुन प्रकाश राज यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

The Kerala Story: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी तर हा सिनेमा (Cinema) प्रपोगांडा असल्याचे सांगितले आहे. तर काही ठिकाणी या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ‘द केरला स्टोरी’ सिनेमावरुन केंद्र सरकारवर (Central Govt) धारेवर धरले आहे.


प्रकाश राज सोशल मीडियावर (Social media) प्रचंड सक्रिय असल्याचे बघायला मिळत असतात. तसेच ते नेहमी समाजातील अनेक घडामोडींवर ट्वीटरद्वारे व्यक्त होत असताना देखील दिसून येत असतात. प्रकाश राज यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘द केरला स्टोरी’ सिनेमाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“प्रिय सुप्रीम लीडर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काल्पनिक प्रपोगांडा असलेल्या या सिनेमाचं प्रमोशन करुन त्याचा वापर करण्यामागे तुमचा काय विचार होता? Just Asking” असं त्यांनी पोस्टमध्ये यावेळी म्हटले आहे. प्रकाश राज यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

दरम्यान बंगाल राज्यामध्ये या सिनेमावर घालण्यात आलेली बंदी न्यायालयाने उठवली आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करत आहे. या चित्रपटाने १५ दिवसांत १६७.८६ कोटींची मोठी कमाई केली आहे.

Tags

follow us