Prarthana Behere: प्रार्थना बेहरेनं शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात हॉट फोटो, दिसला रोमँटिक अंदाज

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही सध्या सोशल मीडियावर (Social media) खूपच सक्रिय असते. तसेच ती विविध लूकमधील फोटो शेअर (Share photos) करत असते. ‘मितवा’, ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेत आणि चित्रपटातून प्रार्थना नेहमी चाहत्यांच्या भेटीस आली. ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेतील तिच्या नेहा या भूमिकेला चाहत्यांनी विशेष पसंती मिळाली […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T142425.884

Prarthana Behere

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही सध्या सोशल मीडियावर (Social media) खूपच सक्रिय असते. तसेच ती विविध लूकमधील फोटो शेअर (Share photos) करत असते. ‘मितवा’, ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेत आणि चित्रपटातून प्रार्थना नेहमी चाहत्यांच्या भेटीस आली. ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेतील तिच्या नेहा या भूमिकेला चाहत्यांनी विशेष पसंती मिळाली आहे.


प्रार्थनाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. नुकतेच प्रार्थनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमधील तिच्या लूकने चाहत्यांनी चांगलच लक्ष वेधले आहे. प्रार्थनाच्या फोटोमधील या लूकला काही चाहत्यांनी तीन चांगलंच ट्रोल केले आहे. प्रार्थनाने ब्लू आणि व्हाईट कलरचा स्विमसूट आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो शेअर केले आहे.

या फोटोला तिने कॅप्शन देखील दिले आहे, ‘Happiness looks like this!’ अशी प्रार्थनाच्या या फोटोला अनेक चाहत्यांनी कमेंट करुन तिला ट्रोल केले आहे. प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोला एका यूजरने कमेंट केली आहे, ‘साऊथ इंडियन कलाकारांकडून शिका, ते कसे आपल्या संस्कृतीला प्रमोट करत आहेत. प्रार्थना ताई तुमचे असे फोटो आम्हाला नाही आवडले.’ तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली, ‘तुम्ही मराठी कलाकार आहात याचं भान थोडं तरी असावं.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

तुमच्या सिरियल खूप गृहिणीवर्ग खूप आवडीने बघतात. जर त्या गृहिणी असं बघितले तर तुमचा शो फ्लॉप पण होऊ शकतो. प्रार्थनाच्या एका चाहत्याने तिच्या फोटोला एक कमेंट करुन ट्रोलर्सला खोचक उत्तर दिले आहे. प्रार्थनाच्या चाहत्याने कमेंट केली, ‘काही पुरुष मंडळी तिला संस्कृती जपण्यास सांगत आहेत जसा काय तिने एकटीने ठेका उचलून धरलाय.

स्विमिंग कॉस्च्युम घालून स्विमींग नाही करणार तर काय साडी घालून करणार का? असा सवाल देखील उपस्थितीत केला आहे. प्रार्थना बेहरे हिने कॉफी आणि बरंच काही, मितवा या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेमुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

Exit mobile version