Prasad Jawade & Amruta Deshmukh Engaged: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) चौथा सिझन चांगलाच गाजला. यातील मुख्य कारण म्हणजे घरातील स्पर्धक. बिग बॉस मराठीचा चौथा सिझन संपून बरेच दिवस उलटले असले तरी काही ना काही कारणामुळे हे स्पर्धक चर्चेत राहतात. या शोची आणि घरातील सदस्यांची चर्चा काही संपत नाही. या सीझनमध्ये प्रसाद जवादे (Prasad Jawade) खूपच गाजला.
तो फायनल मध्ये पोहचला नसला तरी प्रेक्षकांचं मन मात्र त्याने जिंकलं. बिग बॉस नंतर त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. तसंच अमृता देशमुख (Amruta Deshmukh) सोबतच्या नात्यामुळे देखील तो चर्चेत आला. आता हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. प्रसादच्या फॅन्ससाठी मोठी खुशखबर आहे. त्याने त्याच्या नात्याबद्दल पोस्ट शेयर करत सांगतिले की, ते लवकरच लग्न करणार आहेत. त्यांनी रोमँटिक फोटो शेयर केले आहेत. या फोटोत दोघे देखील त्यांची अंगठी फ्लाँट करत असल्याचे दिसून आले आहेत.
या दोघांनी फोटो शेयर करत आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘आमचा साखरपुडा झाला आहे. तसेच आता आम्ही अधिकृतपणे एकमेकांसोबत कायमचे नात्यात बांधले गेलो आहोत, आमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येला आम्ही सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी पोस्ट सांगितले आहे. आणि या पोस्टमध्ये त्यांनी त्याच्या लग्नाची तारीख देखील चाहत्यांना शेयर केली आहे.
Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…
तसेच येत्या १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे. सुरुवातीला १६ लोकांपैकी माझी बाजू घेऊन कोणी बोललं असेल तर ती फक्त अमृता देशमुखे होती. त्या गोष्टीचा आदर मी कायमच ठेवतो. हा आदर कायमच माझ्या मनात असेल. नंतर खेळ पुढे जात होता. वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण आम्हा दोघांनाही एकमेकांच्या मनातलं कळायचं. माझ्या मनातलं तिला कळायचं असं मला वाटतं. तेच मला तिला भेटून विचारायचं आहे.” अमृता व प्रसादमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे हे त्याच्या बोलण्यामधून स्पष्ट झाल्याचे दिसून आले होते.