Download App

‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमातील सोनू निगमच्या आवाजातील ‘मस्तीची सफर…’ गाणे प्रदर्शित

Ekda Yeun Tar Bagha Song Released: आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसला आहे. (Marathi Movie) ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) अशा शीर्षकाच्या धमाल सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर करत आहे. (Social media) नुकतचं या सिनेमातील मनमौजी सफर करणारं सोनू निगमच्या सुमधुर आवाजातलं धमाल गाणं ‘मस्तीची सफर’ (Mastichi Safar) गाणं रिलीज करण्यात आला आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित (Teaser released) करण्यात आला होता. तसेच 8 डिसेंबर दिवशी चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात सुरुवात झाली होती. गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), भाऊ कदम (Bhalchandra Kadam), तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), पॅडी कांबळे, ओंकार भोजने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, नम्रता संभेराव (Namrata Sambherao), रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे कलाकार या सिनेमातून आपल्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहेत.

‘एकदा येऊन तर बघा’ या सिनेमाचा दमदार टीझर चाहत्यांच्या भेटीला आला. 1 मिनिटं 4 सेकंदाच्या टीझरमध्ये चाहत्यांना कलाकारांच्या भूमिका आणि कथानकाबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय एका नव्याकोऱ्या हॉटेलची सुरूवात करत असल्याचे बघायला मिळत आहे. पात्रांची नावं टीझरमध्ये उघड करण्यात आली नाहीत.

‘एकदा येऊन तर बघा’ या मराठी सिनेमात अभिनेत्री तेजस्विनी पंडित गिरीश कुलकर्णींच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. तसेच ओंकार भोजने आणि प्रसाद खांडेकर त्यांचे भाऊ आणि नम्रता संभेराव सिनेमात तेजस्विनीची बहीण असल्याचे टीझरमधून बघायला मिळत आहे. हे कुटुंबीय मिळून नवंकोरं हॉटेल सुरू करत आहेत. परंतु, नव्या हॉटेलमध्ये नेमक्या कोणत्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे, हे प्रेक्षकांना 8 डिसेंबर दिवशी बघायला मिळणार आहे.

London Misal Trailer: मनोरंजनाचा इंग्लिश तडका! ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचं धमाकेदार ट्रेलर रिलीज

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.

Tags

follow us