मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता प्रसाद ओकनं (Prasad Oak)रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. धर्मवीर (Dharmveer)चित्रपटातील आनंद दिघेंच्या भूमिकेनं तर प्रसादनं आपल्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. आपल्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. प्रसादनं आजवर अनेक पुरस्कार (Award) मिळवले आहेत. तरीही तरीही तो आपल्या चाहत्यांशी तितकाच जोडलेला असतो. प्रसाद ओक आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या (Social Media)माध्यमातून कायमच सक्रीय असतो. तो नेहमी रिल्स शेअर करत आपल्या चाहत्यांना भेटत असतो. त्यानं नुकतीच एक परखड मुलाखत दिली होती. त्यात आपल्या नातेवाईकांबद्दल त्याचं परखड मत व्यक्त केलं आहे. त्यात त्यानं म्हटलंय की, मला माझ्या नातेवाईकांनी चांगलं असं काहीच दिलं नाही.
प्रसादनं नुकतीच एका युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती. त्याचा एक व्हिडीओ एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या मुलाखतीमध्ये प्रसाद म्हणाला की, माझ्या यशात मंजिरीचा 100 टक्के वाटा आहे. 1996 साली तिनं मला पुणे सोडून मुंबईला जाण्यासाठी सांगितलं. तिच्यामुळचं आज मी इथं आहे.
मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी 1998 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरही एक वर्ष मी एकटाच मुंबईत होतो. त्यानंतर 1999 मध्ये मंजिरी मुंबईला आली. त्यानंतर आमचा संसार सुरु झाला. या सगळ्यामध्ये घर मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण सगळं मंजिरीनं सांभाळलं असंही ते यावेळी म्हणाले.
पुढं जेव्हा मी याक्षेत्रात आलो तेव्हा सुरुवातीला नातेवाईक म्हणायचे हे काय क्षेत्र आहे का? यात करिअर करायचं असतं का? चांगली बँकेत कुठेतरी नोकरी करायची असते. कुठेतरी बँकेत नोकरी शोधली असतीस असं काहीतरी म्हणायचे तेव्हा असं म्हणणारे नातेवाईक आता त्यांच्याच मुलाबाळांना माझ्यासोबत फोटो काढायला पाठनवतात असंही त्यावेळी प्रसाद म्हणाला.