Download App

लग्नानंतर प्रथमेशच पुनरागमन; ‘मुंबई लोकल’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच एकत्र दिसणार…

Prathmesh Parab अभिनेता प्रथमेश परब हा चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. 'मुंबई लोकल' या चित्रपटामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prathmesh Parab Come Back with Dnyanada Ramtirthkar : नुकताच विवाहबंधनात अडकलेला अभिनेता प्रथमेश परब ( Prathmesh Parab ) हा चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. ‘मुंबई लोकल’ ( Mumbai Local ) या चित्रपटामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ( Dnyanada Ramtirthkar ) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली.

भारतीय संघात होणार मोठा बदल? बीबीसीआय ‘या’ पदासाठी मागविणार अर्ज

टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. विनोदी भूमिकांसह त्याच्यातील गंभीर अभिनेत्याचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. त्यामुळे प्रथमेश परब हा नव्या पिढीतला लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. तर ज्ञानदा रामतीर्थकरनं प्रामुख्यानं टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ज्ञानदाच्या सख्या रे, जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे, ठिपक्यांची रांगोळी अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय धुरळासारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत.

दाभोलकर हत्या प्रकरण : न्यायालयाचा निकाल म्हणजे ‘त्यांचा’ पराभव; ‘सनातन’ची पहिली प्रतिक्रिया

बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी यांनी “मुंबई लोकल” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्राची राऊत, सचिन अगरवाल सहनिर्माते असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित करणार आहेत. या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे आदी कलाकारही आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी करणार असून संकलन स्वप्निल जाधव यांचे आहे. क्रिएटिव्ह प्रोडूसर आणि सह दिग्दर्शक विनोद शिंदे असून कलादिग्दर्शक म्हणून सुमित पाटील पाहणार आहेत. कार्यकारी निर्माता नीलेश गुंडाळे तर रश्मी राठी कपडेपट पाहणार आहेत. संगीतकार म्हणून देव आशिष आणि हर्षवर्धन वावरे काम पाहत आहेत. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

follow us

वेब स्टोरीज