दाभोलकर हत्या प्रकरण : न्यायालयाचा निकाल म्हणजे ‘त्यांचा’ पराभव; ‘सनातन’ची पहिली प्रतिक्रिया

दाभोलकर हत्या प्रकरण : न्यायालयाचा निकाल म्हणजे ‘त्यांचा’ पराभव; ‘सनातन’ची पहिली प्रतिक्रिया

Pune News : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर (Dabholkar murder) यांच्या हत्येप्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आज (दि.10) महत्त्वाचा निर्णय देत तीन आरोपींना निर्दोष, तर दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालायाने सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर, विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या निकालानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. सनातन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेत या प्रकरणी भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणाचा तपास संशयास्पद आहे हे या निकालावरून स्पष्ट झालं आहे. देशात हिंदू दहशतवाद आहे हे सिद्ध करण्यासाठी हे प्रकरण तयार करण्यात येऊन यात हिंदू लोकांना अडकवण्यात आलं. या प्रकरणाच्या तपासाची दिशा सर्वात आधी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच भरकटवली. त्यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते अतिशय चुकीचं होतं, असे संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले.

मोठी बातमी : तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर खून खटल्याचा फैसला; दोघांना जन्मठेप तर, तिघे निर्दोष

अकरा वर्षांनंतर पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. आम्ही न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो. आज यातलं मुख्य नॅरेटिव्ह नष्ट झालं आहे. या प्रकरणात संजीव पुनाळेकर यांचा एकेरी उल्लेख करत जी बदनामी केली गेली त्याची भरपाई कोण करणार? असा सवाल वर्तक यांनी केला. या प्रकरणात आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केलं होतं. आमच्या आश्रमांवर धाडी टाकण्यात आल्या, साधक परिवाराची चौकशी झाली त्यावेळीही आम्ही सहकार्य केलं.

बँक खात्यांचीही तपासणी केली गेली. सापडलं काय तर काहीच नाही. आज तर सगळंच पितळ उघड पडलं. ज्या शक्तींनी हिंदू दहशतवादाचं कुभांड रचलं होतं. या शक्तींचा हा निकाल म्हणजे सपशेल पराभव आहे. या सगळ्या प्रकरणात निरपराध तरुणांना गोवण्यात आलं होतं. त्यांना शिक्षा झाली त्यांचे वकील सक्षम आहेत ते पुढे जातील, असे वर्तक यांनी स्पष्ट केले.

Pune News :पुणे पोलिसांची धडक कारवाई! महिनाभराच्या मोहिमेत 42 पिस्टल अन् काडतूसे जप्त

follow us
  • fb
  • instagram
  • youtube