Pune News :पुणे पोलिसांची धडक कारवाई! महिनाभराच्या मोहिमेत 42 पिस्टल अन् काडतूसे जप्त

Pune News :पुणे पोलिसांची धडक कारवाई! महिनाभराच्या मोहिमेत 42 पिस्टल अन् काडतूसे जप्त

Pune News : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. कोयत्याने दिवसाढवळ्या हल्ले होत असल्याने शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच दहशतीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वात पोलीस रस्त्यावर उतरले होते. पोलिसांच्या पथकाने अथक परिश्रम करत महिनाभराच्या काळात तब्बल 42 पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केली. पोलीस पथकांच्या या कामगिरीची माहिती अमितेश कुमार यांनी स्वतः पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुका असल्यानेही पोलीस सतर्क राहून शहरात विविध ठिकाणी कारवाई करत आहेत.

अमितेश कुमार म्हणाले, या मोहिमेत मागील महिनाभराच्या काळात एकूण 42 पिस्टल जप्त करण्यात आली. त्यापैकी 28 पिस्टल आणि 54 काडतूस गुन्हे शाखेने तर 14 फायर आर्म्स आणि 20 काडतूस विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी जप्त केले आहेत. एका आरोपीकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी टीम तयार करण्यात आली. यावेळी या आरोपीकडून गोळीबार करण्यात आला. पण नंतर या आरोपीला पथकाने मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. या कामगिरीबद्दल पोलीस पथकाला बक्षीस जाहीर करण्यात आले.

Pune Loksabha : भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर! उमेदवारच बदलण्याची मागणी; काकडेंचा नाराजीचा सूर

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्भूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. शहरात फक्त कायदा पॅटर्न सुरू राहील. शहरातील अवैध धंद्यावर कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अमितेश कुमार यांनी यावेळी दिला. या व्यतिरिक्त शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडू सातत्याने प्रयत्न केले जात असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी यावेळी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्याच्या निर्णयावरही कुमार यांनी भाष्य केले. पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय हा वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आला आहे. आम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतलेला नाही. काहीतरी विचार करुनचा हा निर्णय घेतला असावा. आता यावर जी टीका होत आहे त्यावर काही टिप्पणी करणे योग्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Lalit Patil Drugs Case : पुणे पोलीस अ‍ॅक्टिव्ह; ललित पाटील प्रकरणात 2 महिला जेरबंद 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज