Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं…

Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं…

Surat Loksabha Election : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलं आहे. देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच भाजपने आपलं खातं उघडलं आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात (Surat Loksabha Election) कमळ फुललं आहे. भाजपचे उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नसून लवकरच घोषणा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मोदी हप्ता बहाद्दर, पंतप्रधान कार्यालय म्हणजे वसुली कार्यालय; आंबेडकरांचे टीकास्त्र

मागील काही दिवसांपासून सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपसह काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांमध्ये हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांच्या निवडणूक अर्जाबाबत भाजपच्या उमेदवाराकडून आक्षेप घेण्यात आला होता. या आक्षेपावर काल सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध झाल्यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्यारेलाल यांच्याशी थेट लढत होणार होती. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बसपाचे उमेदवार प्यारेलाल यांनी आपला फॉर्म मागे घेतल्याने या जागेवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं सांगितलं जात आहे.

हिंदुत्व सोडलंय, गाण्यात जय भवानी का आणावं; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पुन्हा वार

सुरत लोकसभा जागेसाठी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने एकूण 9 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अपक्षांसह 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता एकच उमेदवार उरला होता. बसपाचे हे उमेदवार प्यारेलाल सुरत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार नसून अशा स्थितीत भाजपचा उमेदवार बिनविरोध घोषित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

हायव्होल्टेज ड्रामानंतर बसपचे उमेदवार प्यारेलाल यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. प्यारेलाल भारती यांना आमिष दाखवले जात असल्याचा अर्ज बहुजन समाज पक्षाचे सुरत जिल्हाध्यक्ष सतीश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला. भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचे निवडणूक प्रतिनिधी दिनेश जोधानी यांनी फॉर्म पडताळणीवेळी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मबाबत आक्षेप घेतला होता आणि काँग्रेस उमेदवाराचा कोणीही प्रस्तावक नसल्याची माहिती असल्याचे सांगितले. काँग्रेस उमेदवाराचे निवडणूक एजंट फिसिक कोल्डी यांनी ही माहिती दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube