Download App

Prithviraj Sukumaran: साऊथचा प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान गंभीर अपघात

Prithviraj Sukumaran Injured: अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पृथ्वीराज त्याच्या ‘विलायथ बुद्ध’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे, त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पायावर की होल्डरचे ऑपरेशन करण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघात झाल्यानंतर या चित्रपटाचे शुटींग थांबवलं आहे, अभिनेता व्यवस्थित बरा होईपर्यंत वाट बघण्यात येणार आहे. या गंभीर दुखापतीवर अभिनेत्याला गेल्या काही महिन्यांच्या सक्ती सुट्टीवर जावं लागणार असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेता पृथ्वीराज ‘विलायथ बुद्ध’ चित्रपटाच्या सेटवर एक फाइट सीन करत होता.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

त्या फाइट सीनच्या दरम्यान त्याच्या अपघात झाला आहे. चित्रपटाचे शुटींग हे मरयूर येथे सुरू होते. अभिनेत्याचा अपघात होताच सेटवरील संपूर्ण ग्रुप घाबरला होता. पृथ्वीराजला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या पायाची सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज त्याची सर्जरी होणार आहे, तसेच पुढील काही दिवस किंवा महिने त्याला आराम घेण्यास सांगितले आहे. जवळपास २-३ महिने त्याला कामातून मोठा ब्रेक घ्यावा लागणार आहे, असे बोलले जात आहे.

Tags

follow us