Priyadarshan shares his experience of working with Ekta in Bhoot Bangla : ‘भूत बंगला’ हा 2026 मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची ‘ओजी’ जोडी तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे. या जोडीने याआधी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक संस्मरणीय कल्ट कॉमेडी चित्रपट दिले आहेत. त्यांच्या अफलातून कॉमिक टाइमिंग आणि मनोरंजनाने भरलेल्या कथांसाठी ओळखली जाणारी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. बालाजी मोशन पिक्चर्स च्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘भूत बंगला’मुळे चाहत्यांमध्ये जुन्या आठवणींची लाट निर्माण झाली आहे.
ऑस्करची ट्रॉफी विकता येते! खरेदीचा नियम कुणाच्या नावे, बदललेला नियम काय?
अलीकडेच दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एकता कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर यांच्या प्रोडक्शन हाऊस बालाजी मोशन पिक्चर्स कडून केली जात आहे. त्यांनी सांगितले की अनेकांनी त्यांना एकता कपूरसोबत काम करणे कठीण असल्याचे सांगितले होते, मात्र त्यांचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता.
एलपीजीचा काळाबाजार झालाच ! राज्यात बाराशे सिलिंडर जप्त; पुरवठामंत्री भुजबळांची थेट आकडेवारी
प्रियदर्शन म्हणाले, “एक गोष्ट मला सांगायची आहे. जेव्हा मी एकता कपूरसोबत चित्रपट करण्यासाठी गेलो, तेव्हा अनेकांनी मला सांगितले की त्यांच्यासोबत काम करणे कठीण असते. पण मला तसे अजिबात वाटले नाही. कदाचित मी नशीबवान आहे. माझ्या आयुष्यातील त्या पहिल्या प्रोड्यूसर आहेत ज्यांनी मला कधीही ‘तुम्ही काय करत आहात?’ असा प्रश्न विचारला नाही आणि मला चित्रपट बनवण्याची पूर्ण क्रिएटिव्ह मोकळीक दिली.”
ते पुढे म्हणाले, “मी आतापर्यंत 98 चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि पहिल्यांदाच एखाद्या प्रोड्यूसरने मला ‘आपण असे करू शकतो का?’ किंवा ‘हे बदलू शकतो का?’ असे विचारले नाही. जवळपास प्रत्येक प्रोड्यूसर काही ना काही हस्तक्षेप करतो. त्यामुळे लोकांनी त्यांच्या सोबत काम करणे कठीण असल्याचे सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले. पण प्रत्यक्षात मला त्यांच्या सोबत काम करणे खूप सोपे वाटले.”
LPG Crises : इंडक्शन शेगडीची ABCD; गॅस टंचाईत उपयोगी विज्ञान, फायदा अन् एक भारी जुगाड!
दरम्यान, ‘भूत बंगला’चा टीझर नुकताच रिलीज झाला असून त्याने इंटरनेटवर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. प्रेक्षकांना जुने कल्ट कॉमेडी पंचलाईन्स आणि थरारक मस्तीची झलक खूप आवडत आहे. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची जोडी तसेच दमदार स्टारकास्टमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
बालाजी टेलिफिल्म लिमिटेड. च्या विभाग असलेल्या बालाजी मोशन पिक्चर्स कडून आणि केप ऑफ गुड फिल्म्स सोबत मिळून ‘भूत बंगला’ सादर करण्यात येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, Wamiqa Gabbi, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी निर्मित केला आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
