चित्रीकरणात प्रत्येक दिवशी नवा थरार इविल डेड बर्नच्या दिग्दर्शकांनी सांगितला अनुभवला
Evil Dead Rise हॉररपटांची लोकप्रिय 'Evil Dead' मालिका आता नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
The director of Evil Dead Burn shared his experience of the daily thrills during filming : हॉररपटांची लोकप्रिय ‘Evil Dead’ मालिका आता नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील सहावा चित्रपट ‘Evil Dead Burn’ 10 जुलै रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मराठी रसिकांची ‘घबाडकुंड’ला दमदार साथ, दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस 8.10 कोटींची कमाई
फ्रेंच दिग्दर्शक सेबॅस्टियन व्हॅनिसेक (Sébastien Vanicek) यांनी या चित्रपटाद्वारे ‘Evil Dead’ फ्रँचायझीमध्ये पदार्पण केले आहे. त्यांनी Florent Bernard यांच्यासोबत मिळून चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात Souheila Yacoub, Tandi Wright, Hunter Doohan, Luciane Buchanan, Erroll Shand आणि Maude Davey यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मालिकेची ओळख असलेला अंगावर काटा आणणारा थरार आणि भीतीचा अनुभव या चित्रपटातूनही कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ZEE5वर ‘फ्रेम’ चित्रपटाचा प्रीमियर ! कर्तव्य आणि विवेकबुद्धीतील संघर्ष लवकरच झी5 मराठीवर
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दिग्दर्शक सेबॅस्टियन व्हॅनिसेक यांनी चित्रीकरणाच्या अनुभवांबद्दल सांगितले. ते म्हणाले, “चित्रीकरणाचा प्रत्येक दिवस वेगळा आणि आश्चर्यांनी भरलेला होता. दररोज काहीतरी नवीन आणि आव्हानात्मक दृश्य चित्रित करायचे असायचे. एखाद्या कार्यालयात किंवा गोदामात काम करण्यापेक्षा चित्रपटाची निर्मिती करणे हा विलक्षण अनुभव होता.”
सहलेखक फ्लॉरेन्ट बर्नार्ड यांनी सांगितले की, ‘Evil Dead’सारख्या प्रतिष्ठित मालिकेसाठी काम करणे हे आव्हानात्मक असले तरी तितकेच सन्मानाचे होते. “आमच्या चर्चेचा केंद्रबिंदू नेहमी पात्रे असायची. ती जणू आमच्या परिचयातील व्यक्ती असल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबद्दल विचार करत असू. वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याचा विचार करून त्यांना अत्यंत कठीण प्रसंगांमध्ये उभे केले,” असे त्यांनी सांगितले.
‘अल्फा’ Review | YRF Spy Universe ला नवी ‘लेडी सुपरस्पाय’ मिळाली… पण ‘अल्फा’ खरंच Alpha ठरतो का?
फ्रँचायझीमध्ये नवीन कथा साकारताना सर्वात मोठे आव्हान कोणते होते, याबाबत बर्नार्ड म्हणाले, “आधीच्या चित्रपटांमधील कथानकाची पुनरावृत्ती टाळणे हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते. त्यामुळे समान वयोगटातील मित्रमंडळींवर आधारित कथा न निवडता, वैयक्तिक दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि सासरच्या कुटुंबासोबत अडकलेल्या एका महिलेची कथा निवडली. या कथेत भावनिक आणि नाट्यमय शक्यता अधिक होत्या.”
ते पुढे म्हणाले की, सेबॅस्टियन व्हॅनिसेक यांचा उद्देश हा मालिकेतील सर्वाधिक रक्तरंजित चित्रपट बनवण्याचा नव्हता, तर सर्वाधिक तीव्र आणि प्रभावी हिंसक थरार अनुभव देणारा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा होता. Sony Pictures Entertainment तर्फे Evil Dead Burn हा चित्रपट 10 जुलै रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.