Download App

Priyanka Chopra: अभिनेत्रीला शूटदरम्यान दुखापत, तरी पूर्ण केला सीन; Photo शेअर करत दिली माहिती

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा ऑस्ट्रेलियात शूटिंगदरम्यान जखमी झाली होती. तिने स्वत: तिच्या दुखापतीची माहिती देत ​​हा फोटो शेअर केला.

Priyanka Chopra Shares Injured Hand Photo : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या भव्य लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) आता लाइट कॅमेरा आणि ॲक्शनच्या दुनियेत परतली आहे. मुंबईहून परतल्यानंतर प्रियांका चोप्रा आता तिच्या आगामी ‘द ब्लफ’ (The Bluff Movie) चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. प्रियांका चोप्राने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्यापासून ती तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून प्रत्येक अपडेट देत असते.


काही काळापूर्वी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ऑस्ट्रेलियात शूटिंगदरम्यान जखमी झाली होती. तिने स्वत: तिच्या दुखापतीची माहिती देत ​​हा फोटो शेअर केला आहे. आता तिने तिच्या जखमी हाताचा फोटो शेअर केला आहे. पण प्रियांकाच्या हातावर दिसणारी जखम खरी नसून मेकअपच्या माध्यमातून तिच्या हातावर खुणा निर्माण झाल्या आहेत.

प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियन मेकअप आर्टिस्ट शेरॉन रॉबिन्स तिच्या हातावर काम करताना दिसत आहे. पहिल्यांदाच हा फोटो पाहिल्यावर चाहते घाबरतील आणि प्रियांकाचे काय झाले असा प्रश्न पडू लागला आहे. मात्र, ही सगळी जादू शेरॉनच्या मेकअपमुळे आहे. फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, “मला मॅनिक्युअरची गरज आहे असे दिसते. #TheBluff.”

प्रियांका चोप्रा ज्या प्रकारे चित्रपटाच्या सेटवरून सतत फोटो शेअर करत आहे, त्यावरून प्रियांका ‘द ब्लफ’ या चित्रपटात दमदार ॲक्शन करताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. द ब्लफचे दिग्दर्शन फ्रँक ई. फ्लॉवर्स करत आहेत. या चित्रात प्रियंका एका महिला समुद्री चाच्याची भूमिका साकारत आहे, जी आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपल्या भूतकाळाशी संघर्ष करत आहे.

Priyanka Chopra photo : प्रियांका चोप्राचे आणखी एक ग्लॅमरस फोटोशूट

अनंतच्या लग्नात प्रियांका थिरकली

गेल्या आठवड्यात प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनाससोबत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका यांच्या लग्नात सहभागी झाली होती. यावेळी तिने अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीत भरपूर डान्स केला. प्रियांकाने अनेक बॉलिवूड स्टार्सनाही भेटले. नंतर त्यांनी अनंत-राधिकासाठी एक खास पोस्ट देखील लिहिली आहे.

follow us