भावाच्या रोका सेरेमनीला Priyanka Chopra चा खास अंदाज; पाहा फोटो

Priyanka Chopra नुकतीच तिचा पती निक जोनास याच्यासोबत भारतात परतली आहे. या दरम्यान तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राची रोका सेरेमनी पार पडली.

प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थने गेल्या कित्येक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री नीलम उपाध्याय सोबत रोका केला आहे.

प्रियंकाची होणारी भावजयी आणि अभिनेत्री नीलम उपाध्याय हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर करत ही माहिती दिली.

या फोटोंमध्ये पती निक जोनस आणि कुटुंबासह प्रियंका चोप्रा खास अंदाजात दिसत आहे.

प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ याचा हा दुसरा रोका आहे. या अगोदर त्याने इशिता कुमार सोबत रोका केला होता. त्यांचं लग्नही होणार होतं. मात्र शेवटी हे नातं तुटलं.
