Download App

Priyanshu Panuli: ‘पिप्पा’ स्टार प्रियांशू पैन्युलीने बीटीएसमधील धम्माल व्हिडिओ केला शेअर

Priyanshu Panuli shares BTS Video: ‘एक्स्ट्रॅक्शन’, ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली, ‘मिर्झापूर, आणि ‘भावेश जोशी” मधील त्याच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला हुशार अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli) सध्या मेजर राम मेहता यांच्या उत्कृष्ट भूमिकेमधून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘पिप्पा’मधून त्याने सगळ्यांची मन जिंकली आहेत. पेन्युलीने अलीकडेच ‘पिप्पा’ च्या (Pippa Movie) शूटचा एक (BTS Video) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे, यामध्ये त्याचे सहकलाकार ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर जोरदार धम्माल करत असल्याचे बघायला मिळत आहे.


व्हिडिओमध्ये या तिघांचे हास्य आणि धमाल कॅप्चर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्या पात्रांमधील भावंडाचे नाते पडद्यावर जिवंत बघायला मिळत आहे. पेन्युलीचे कॅप्शन विनोदीपणे हे प्रतिबिंबित करते, “लहान भावंडे अशी असतात… एक मला बंदुकीने मारत आहे (माझ्याशी ओळख झालेल्या सर्वोत्तम जादुई गोष्टींपैकी एक, धन्यवाद @ishaankhatter), आणि दुसरा @mrunalthakur तुमच्या गाण्यावर हसतो. … @अररहमानला माझा अभिमान वाटेल. या दोघांसोबत शूट करण्याचा सर्वोत्तम काळ.” असे त्याने यावेळी लिहिले आहे.

चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली,” आणि “यू-टर्न” या सिनेमामधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर अभिनेता आणखी एक आशादायक उपक्रम “पिप्पा”साठी तयारी करत आहे. प्रेक्षक त्याच्या पडद्यावर परत येण्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. यू-टर्न” आणि “चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली,” आणि आता “पिप्पा” सारख्या सिनेमात अफलातून काम करतोय. चाहते त्याच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक करत असताना अभिनेता त्याच्या आगामी वेब सिरीज “शेहर लखोत” साठी सज्ज झाला आहे.

Starfish Trailer: मिलिंद सोमणचा ‘स्टारफिश’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

तसेच नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘एक्स्ट्रॅक्शन’सिनेमातील क्राईम लॉर्ड ते अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूरच्या दुसऱ्या भागातील रॉबिन… अभिनेता प्रियांशू पैन्युली याने अल्पावधीतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओळख मिळवली आहे. ‘चलो, ये भी ठीक है’ हा डायलॉग रॉबिनच्या तोंडी प्रचंड गाजला होता. गर्लफ्रेण्ड वंदना जोशीसोबत तो नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.

Tags

follow us