Priyanshu Panuli: प्रियांशू पैन्युलीने त्याच्या आगामी प्रोजेक्ट’ची शेअर केली एक झलक
Priyanshu Panuli shares BTS Photo: ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’, मिर्झापूर (Mirzapur), एक्स्ट्रॅक्शन आणि भावेश जोशी मधील अशा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli ) हा त्याच्या अनोख्या आणि तितक्याच वेगवेगळ्या भूमिकासाठी ओळखला जातो. तो आता आगामी शो “पान परदा जर्दा” मध्ये (Paan Purda Zarda Movie) नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला असून या वेबशो मध्ये प्रियांशू ‘सिकंदर’ (Sikandar) नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
View this post on Instagram
या अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर यातील पडद्यामागील एक झलक शेअर केली आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्रियांशूने BTS शॉटला कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नवीन दिवस.. नवीन वेळापत्रक’ या अनोख्या संदेशाने हा नवा प्रोजेक्ट नक्कीच वेगळा असणार यात शंका नाही.
चाहत्यांची उत्कंठा वाढवणारी गोष्ट म्हणजे प्रियांशू पैन्युली आणि “पान पर्दा जर्दा” चे निर्माते कुशलतेने त्याच्या नवीन लूक बद्दल सध्या काही काहीतरी लपवत आहेत. प्रियांशू पैन्युली या नवीन प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे.
चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली,” आणि “यू-टर्न” या सिनेमामधून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर अभिनेता आणखी एक आशादायक उपक्रम “पिप्पा”साठी तयारी करत आहे. प्रेक्षक त्याच्या पडद्यावर परत येण्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.
Dunki Teaser Release date: किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट
तसेच नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘एक्स्ट्रॅक्शन’सिनेमातील क्राईम लॉर्ड ते अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूरच्या दुसऱ्या भागातील रॉबिन… अभिनेता प्रियांशू पैन्युली याने अल्पावधीतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओळख मिळवली आहे. ‘चलो, ये भी ठीक है’ हा डायलॉग रॉबिनच्या तोंडी प्रचंड गाजला होता. गर्लफ्रेण्ड वंदना जोशीसोबत तो नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.