Download App

ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक विवेक वाघ यांचं निधन; मरणोत्तर केलं अवयवदान

Vivek Wagh यांचं निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Producer and Director Vivek Wagh Passed Away : मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम निर्माते आणि दिग्दर्शक (Producer and Director) विवेक वाघ (Vivek Wagh) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Kalyani Jadhav : कल्याणी जाधवच्या बोल्ड फोटोशूटने वेधलं चाहत्याचं लक्ष

विवेक वाघ यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने त्या प्रक्रियेमध्ये काही तास लागतील. ती प्रक्रिया झाल्यावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Ellipsis Entertainment आगामी सिनेमात जगातील सर्वात मोठा बँक घोटाळा उघड करणार

त्यांच्या रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कारकीर्द बद्दल सांगायचं झालं. तर त्यांनी व्यावसायिक नाटकांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर चेकमेट, माझं भिरंभिरं, सिद्धांत अशा गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर नुकतेच काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित जक्कल हा त्यांचा शोध माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या माहिती पटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बारस्कर यांची गाडी जाळली

त्यांच्या याच माहितीपटावर वेब सिरीज देखील काढण्यात आला आहे. तर नुकतंच कोकणातील कातळ शिल्पांवर आधारित ‘स्टोन अँड एज’ हा माहितीपट देखील त्यांनी निर्माण केला होता.

follow us