Download App

Pune : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शतकमहोत्सवी सोहळा ‘या’ शहरांमध्ये होणार संपन्न

Pune : पुणे (Pune ) आणि राज्यातील अनेक शहरांत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शतकमहोत्सवी सोहळा पार पडणार आहे. या शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाचे अध्यक्ष हे डॉ. जब्ब्बर पटेल असणार आहेत. तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व मुख्य निमंत्रक उदय सामंत आहेत. तंजावर येथे उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू होणार आहे.

Maratha Reservation: आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे तो बघायचाय; जरांगेंचे भुजबळांना पुन्हा चँलेज

यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे 2024 अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.

असे असणार संमेलनाचे विविध शहरांतील वेळापत्रक…

5 जानेवारी 2024 रोजी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे येथे संपन्न होणार. 6 जानेवारी 2024 ला पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसेच 7 जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. 20 आणि 21 जानेवारी अहमदनगर, 27 आणि 28 जानेवारीला सोलापूर, 4 फेब्रुवारी बीड, 10 आणि 11 फेब्रुवारी लातूर, 17 आणि 18 फेब्रुवारी नागपूर, आणि मुंबई येथे नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी सोडला मुख्यमंत्रीपदावरचा दावा, ‘मी कधीही स्पर्धेत नव्हतो’

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला आहे. विजेत्यांना भरघोस अशी बक्षीस देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंतांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीतील पहिल्या 3 विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल. या संपूर्ण 100 व्या नाट्य संमेलनास रसिक आणि रंगकर्मींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

Tags

follow us