Download App

Jhimma 2: नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं ‘झिम्मा 2′ मधील ‘पुन्हा झिम्मा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

Punha Jhimma Song Release: 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ने चाहत्यांचे मन जिंकले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली. हेमंत ढोमे दिग्दर्शित (Directed by Hemant Dhome) ‘झिम्मा 2’ (Jhimma 2 Movie) येत्या 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘झिम्मा’मध्ये असलेल्या पाच मैत्रिणींचा ग्रुप आता ‘झिम्मा 2’ मध्ये आणखीन मोठा झाला आहे. नक्कीच प्रेक्षकांना यामध्ये दुप्पट मनोरंजन मिळणार आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा हा ‘पुन्हा झिम्मा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या गाण्यामध्ये सिद्धार्थचा एक खतरनाक डायलॉग आहे, ”यावेळेला खूपच व्हरायटी आहे.” आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात अनोखे रंग बरसणार आहेत. मागच्यावेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली. आणि आता ‘झिम्मा 2’ मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे बघायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल खूपच अविस्मरणीय ठरू शकणार आहे.

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्याचे बघायला मिळणार आहे. आणि या टीझरमध्ये त्यांची पात्रदेखील खूपच भन्नाट वाटत आहेत. ‘झिम्मा’ मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता येणार आहे. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव ‘झिम्मा’ने करून दिल्याचे सांगितले जात आहे. हेच ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा मराठी सिनेमा पुन्हा एकदा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा सिनेमा असणार आहे.

Ankita Lokhande: सुशांतबद्दल बोलताना अंकिता पुन्हा भावूक; म्हणाली, “मी तर त्याच्या अंत्यविधीलाही..”

याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात की, ”याअगोदर प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ सिनेमाला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला. अनेक पुरस्कारांवर सिनेमाने मोहोर उमटवली. ‘झिम्मा’ बघून अनेक महिलांनी, ज्या कधीही कुटुंबाशिवाय बाहेर फिरल्या नाहीत, त्यांनी स्वतः मैत्रिणींसोबत सहली आयोजित केल्या आहेत. प्रेक्षकांनी मेसेजद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्हाला ‘झिम्मा 2’ यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आम्ही ‘झिम्मा 2′ साठी प्रेरित झालो आणि चांगली कथा तयार झाली. प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाही, परंतु मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात! याच कल्पनेवर आधारित ही ‘रियुनियन’ दुपटीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, हे नक्कीच !’

गेल्या काही काळानंतर एकत्र आल्यानंतर आता या सगळ्यांचे ‘रियुनियन’ किती हॅपनिंग असणार, हे अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे बघायला मिळणार आहे. यामुळे आता प्रतीक्षा आहे. ‘झिम्मा 2′ हा सिनेमा 24 नोव्हेंबर दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज