Jhimma 2 : सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा 2’ चा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज
Jhimma 2 Trailer Relese Date Annouced: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) सिनेमा सध्या जोहरदार चर्चेत आला आहे. (Marathi Movie) गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Jhimma 2 Marathi Movie)चाहत्यांकडून या टीझरला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) याबाबत सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘झिम्मा 2’ च्या ट्रोलबद्दल मोठी घोषणा केली आहे. उद्या (13 नोव्हेंबरला) झिम्मा 2 ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थने ‘झिम्मा 2’ च पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की, TRAILER OUT TOMORROW! Reuinion किती धुडूम! होणारे हे उद्या कळेलच! 24 नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…
या सिनेमाचा पहिला भाग ‘झिम्मा’ 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘झिम्माला’ चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. यामुळे ‘झिम्मा 2’बद्दल चाहत्यांच्या मनात मोठी उत्सुक्ता निर्माण झाली आहे. 24 नोव्हेंबरला ‘झिम्मा 2’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्याचे बघायला मिळणार आहे. आणि या टीझरमध्ये त्यांची पात्रदेखील खूपच भन्नाट वाटत आहेत. ‘झिम्मा’ मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता येणार आहे. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव ‘झिम्मा’ने करून दिल्याचे सांगितले जात आहे. हेच ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा मराठी सिनेमा पुन्हा एकदा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा सिनेमा असणार आहे.
Mansi Naik म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’ ‘लावण्यवती’तील तिसरी लावणी प्रेक्षकांच्या भेटीला
याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात की, ”याअगोदर प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ सिनेमाला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला. अनेक पुरस्कारांवर सिनेमाने मोहोर उमटवली. ‘झिम्मा’ बघून अनेक महिलांनी, ज्या कधीही कुटुंबाशिवाय बाहेर फिरल्या नाहीत, त्यांनी स्वतः मैत्रिणींसोबत सहली आयोजित केल्या आहेत. प्रेक्षकांनी मेसेजद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्हाला ‘झिम्मा 2’ यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आम्ही ‘झिम्मा 2′ साठी प्रेरित झालो आणि चांगली कथा तयार झाली. प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाही, परंतु मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात! याच कल्पनेवर आधारित ही ‘रियुनियन’ दुपटीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, हे नक्कीच !’