Download App

बॉक्स ऑफिसवर दिसली ‘श्रीकांत’ची जादू; राजकुमारच्या चित्रपटाने पाच दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

Srikanth Box Office : राजकुमार राव आणि ज्योतिका यांच्या मुख्य भूमिका असलेला 'श्रीकांत' चित्रपट 10 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Srikanth Box Office Collection Day 5: राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि ज्योतिका (Jyothika) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘श्रीकांत’ (Srikanth Movie) चित्रपट 10 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या प्रेरणादायी बायोपिकमध्ये, राजकुमार राव यांनी दृष्टिहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला यांची भूमिका केली होती, परंतु आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. चला तर मग आतापर्यंत ‘श्रीकांत’ सिनेमाने किती कमाई केली जाणून घेऊया…


‘श्रीकांत’ने रिलीजच्या 5 व्या दिवशी किती कमाई केली?

गेल्या महिनाभरापासून बॉक्स ऑफिसवर शांतता आहे. अक्षय-टायगरचे ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि अजय देवगणचे ‘मैदान’ यासह सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आता राजकुमार राव स्टारर आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ चित्रपटाने रिकाम्या थिएटरमध्ये काही चमक आणली आहे. या चित्रपटाची सुरुवात थोडी संथ झाली असली तरी. पण वीकेंडला चित्रपटाने दमदार कलेक्शन केले.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘श्रीकांत’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 4.2 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी ‘श्रीकांत’ने 5.5 कोटींचा व्यवसाय केला, तर चौथ्या दिवशी चित्रपटाने 1.65 कोटींचा गल्ला जमवला. आता ‘श्रीकांत’च्या रिलीजच्या पाचव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘श्रीकांत’ ने रिलीजच्या पाचव्या दिवशी 1.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, ‘श्रीकांत’चे पाच दिवसांचे एकूण कलेक्शन 15.00 कोटी रुपये झाले आहे.

‘श्रीकांत’ बराच काळ चित्रपटगृहात राहणार

‘श्रीकांत’च्या कमाईत नि:संशय घसरण झाली आहे. पण आठवड्याच्या दिवसात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण होणे सामान्य आहे. मात्र, या चित्रपटाने रिलीजच्या 5 दिवसांत 15 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता हा चित्रपट दीर्घकाळ टिकणार आहे. अशा परिस्थितीत 40 कोटींच्या मिड बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट त्याची किंमत वसूल करू शकणार आहे.

Panchayat 3: ‘फुलेरा’मध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं, कोण होणार नवा सचिव? ‘पंचायत 3’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

राजकुमार राव यांचा हा चित्रपट श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक

हा चित्रपट 1992 मध्ये मछलीपट्टणमच्या सीतारामपुरम गावात जन्मलेल्या दृष्टिहीन श्रीकांतच्या संघर्षाची कथा सांगतो. श्रीकांत बोल्ला यांना बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली होती. राजकुमार रावने या चित्रपटात श्रीकांत बोल्लाची मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

follow us