Download App

Rajkummar Rao: ‘श्रीकांत’साठी राष्ट्रीय पुरस्कार निश्चित? अभिनेता राजकुमार थेटच म्हणाला…

Rajkummar Rao: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) त्याच्या आगामी ‘श्रीकांत’ (Srikanth Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. ‘श्रीकांत’ चित्रपटातील ‘पापा कहते हैं’ हे गाणे 22 एप्रिल 2024 रोजी मुंबईत झालेल्या एका संगीत कार्यक्रमात लाँच करण्यात आले. या खास सोहळ्याला खुद्द आमिर खानने (Aamir Khan) देखील हजेरी लावली होती.

आमिर खानवर ‘पापा कहते हैं’ हे गाणे चित्रित करण्यात आले होते. त्यामुळे श्रीकांतच्या टीमने राजकुमारवर चित्रित केलेले नवीन गाणे लाँच करण्यात आला आहे. यावेळी जेव्हा कार्यक्रमाच्या होस्टने आमिरसमोर राजकुमार रावला विचारले की, तो यावर्षीही राष्ट्रीय पुरस्कार जिंकणार आहे का? तेव्हा अभिनेत्याने थेट उत्तर दिले आहे.

‘पापा कहते हैं’ हे गाणे त्याच्यासाठी खास का आहे याबद्दल बोलताना राजकुमार राव म्हणाला की, “मी आमिर सरांना सांगत होतो की हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यावर जेव्हा मी दिल्लीला थिएटर करायला जायचो तेव्हा दिल्ली ते गुडगाव आणि गुडगाव ते दिल्ली असा बहुतेक प्रवास सायकलने करायचो. या प्रवासात मी वॉकमनवर काही गाणी ऐकायचो. आणि त्यातलं एक गाणं मला खूप आवडलं. आणि ते म्हणजे ‘पापा कहते हैं’. मी स्वतःला प्रेरित करण्यासाठी हे गाणे ऐकायचो. तिथून इथपर्यंतचा प्रवास खूप खास आहे. आमिर सरांच्या कामातून आपण सर्वांनी खूप प्रेरणा घेतली आहे. आणि आजही ते आमच्या गाण्याच्या लॉन्चसाठी आला आहे. सर, आम्हाला सर्व काही शिकवल्याबद्दल धन्यवाद.

‘शाहरुख खान’ पुन्हा एकदा झळकणार डॉनच्या भूमिकेत, जाणून घ्या कोणत्या चित्रपटात

श्रीकांतला राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो का?

यादरम्यान कार्यक्रम दरम्यान राजकुमार राव यांना विचारले की आता आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार येणार आहे का? आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार निश्चित झाल्याचे ऐकले आहे. होस्टने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना राजकुमार राव म्हणाले, “असे झाले तर तुमच्या तोंडात तूप, साखर असेल. आणि मग आम्ही सर्वांसाठी एखादी पार्टी नक्की देऊ, अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने यावेळी दिली.

follow us

वेब स्टोरीज