‘शाहरुख खान’ पुन्हा एकदा झळकणार डॉनच्या भूमिकेत, जाणून घ्या कोणत्या चित्रपटात

‘शाहरुख खान’ पुन्हा एकदा झळकणार डॉनच्या भूमिकेत, जाणून घ्या कोणत्या चित्रपटात

Shah Rukh Khan As Don: शाहरुख खान (Shah Rukh Khan) अनेक वर्षांनी 2023 साली रुपेरी पडद्यावर परतला आहे. 2023 मध्ये त्याचे तीन चित्रपट थिएटरमध्ये आले. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (box office) जबरदस्त कमाई केली आहे. आता शाहरुख खान डॉन (Don) अवतारात परतणार आहे. एकीकडे शाहरुख खानने डॉन फ्रेंचायझी सोडली असताना दुसरीकडे आता त्याला पुन्हा डॉन बनण्याची संधी मिळाली आहे.

शाहरुख खान डॉन फ्रँचायझीच्या थ्रीक्वलचा भाग नाही. आता या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh) डॉनची भूमिका साकारणार आहे. डॉन फ्रेंचायझी सोडल्यानंतर शाहरुख खान आता त्याची लेक सुहाना खानसोबत ‘द किंग’ चित्रपटात दिसणार आहे. सुजॉय घोषच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटमध्ये बनणार

याआधी ‘द किंग’मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ असणार असल्याची बातमी होती. पण आता तो खलनायकाच्या भूमिकेत असल्याची बातमी समोर आली आहे. ‘द किंग’ हा सुहाना खानचा मोठ्या पडद्यावरचा पहिला चित्रपट आहे. याआधी सुहानाचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम झाला होता. जी गुरु आणि शिष्याची कथा असणार आहे. 200 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनत असलेल्या या चित्रपटात सुहाना खान ॲक्शन अवतारात दिसणार आहे, ज्यासाठी ती कठोर प्रशिक्षणही घेत आहे.

Rohit Saraf: रोहित सराफने प्रेक्षकांना दिली नव्या प्रोजेक्ट्बद्दल हिंट

चित्रपटातील शाहरुखचा लूक

पिंकविलाच्या मते, शाहरुख खान प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवत आहे आणि त्याला माहित आहे की लोक त्याला ग्रे शेड्समध्ये पाहण्याची वाट पाहत आहेत. ‘द किंग’मध्ये तो सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोषसोबत काम करत आहे. ‘द किंग’मधील शाहरुख खानच्या लूकबद्दल सांगायचे तर तो लांब केस आणि हलकी दाढी असलेला दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube