Rajkummar Rao च्या ‘श्रीकांत’चा ट्रेलर आऊट; प्रेक्षकांसाठी एक अनोखी पर्वणी!

Rajkummar Raos Film Shrikanth Trailer Out : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. आता 2024 वर्षात राजकुमार राव हा अनेक नवनवीन चित्रपट करताना दिसणार असून त्याच्या आगामी “श्रीकांत” (Srikanth Movie) चा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संसदेतील भाषणांनी मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही, भाषणं मी ही एक […]

'श्रीकांत' मध्ये स्वतःला विसरला Rajkummar Rao निर्मात्यांनाही केलं प्रभावित

Rajkummar Rao

Rajkummar Raos Film Shrikanth Trailer Out : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. आता 2024 वर्षात राजकुमार राव हा अनेक नवनवीन चित्रपट करताना दिसणार असून त्याच्या आगामी “श्रीकांत” (Srikanth Movie) चा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

संसदेतील भाषणांनी मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही, भाषणं मी ही एक नंबर करतो; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना टोला

या ट्रेलरने प्रेक्षकांना एक अनोखी पर्वणी दिली आहे. हा ट्रेलर श्रीकांत बोल्ला यांच्या प्रवासाची झलक दाखवून जातो. ज्याने बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना किती कष्ट करून केली हे यातून दिसून येत. राजकुमारने पूर्वीच्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट भूमिकांद्वारे अमिट छाप सोडली आहे असून त्याने या चित्रपटात देखील दमदार भूमिका साकारली असणार यात शंका नाही.

चंद्रकांत खैरे विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील दुश्मनी, दोघांचीही जिरवणारी!

अलीकडील व्हिडिओ मध्ये राजकुमार आणि श्रीकांत बोल्ला एकत्र दिसले. या व्हिडिओने सिद्ध केले की हा चित्रपट कसा उत्कृष्ट असणार आहे आणि 10 मे 2024 रोजी तो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडणार आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ मध्ये आलिया एफ, शरद केळकर आणि ज्योतिका यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘श्रीकांत’ व्यतिरिक्त राजकुमार रावकडे ‘स्त्री 2’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.

‘श्रीकांत – आ रहा है सबकी आँखे खोलने’ तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आहे, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित आहेत. हा चित्रपट 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशभरात प्रदर्शित होत आहे.

Exit mobile version