Video : राखी सावंतचा दारू पिऊन डान्स, व्हिडीओ व्हायरल…

Rakhi Sawant: बॉलिवूड अभिनेत्री राखी (Rakhi Sawant) सावंत कायम तिच्या ड्रामामुळे (Drama Queen) जोरदार चर्चेत असते. राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल देखील होत असतात. (Video Viral) पती आदिल खान प्रकरणामुळे राखी खूपच चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा राखीचा चाहत्यांना ड्रामा बघायला मिळत आहे.   View this post on Instagram   […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T104205.323

Rakhi Sawant

Rakhi Sawant: बॉलिवूड अभिनेत्री राखी (Rakhi Sawant) सावंत कायम तिच्या ड्रामामुळे (Drama Queen) जोरदार चर्चेत असते. राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल देखील होत असतात. (Video Viral) पती आदिल खान प्रकरणामुळे राखी खूपच चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा राखीचा चाहत्यांना ड्रामा बघायला मिळत आहे.


राखीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. राखीने ‘शराबी’ या गाण्याच्या (Sharabi Song ) इव्हेंटकरिता हजेरी लावली होती. या इव्हेंटकरिता राखीने एकदम झक्कास लूक केला होता. लाल आणि काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घालून राखी खूपच हॉट दिसत होती.

या कार्यक्रमात राखीने ‘शराबी’ गाण्यावर जोरदार डान्स देखील केला आहे. भर कार्यक्रमामध्ये राखीने दारुचा ग्लास डोक्यावर घेत डान्स केला आहे. यानंतर ती ग्लासमधील दारूही प्यायली. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, त्यावर चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.


या व्हिडीओवर कमेंट करत राखीने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देखील दिले आहे. ‘अनेक मुस्लीम लोक दारू पित असतात. पण मी कधीच दारू पित नाही. यामुळे माझ्याविषयी आपले काहीपण मत बनवू नका. शराबी हे गाणं होतं. त्यामुळे दारूचा ग्लास घेऊन मी डान्स केला आहे. मी इतरांपेक्षा वेगळी आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

त्यामुळे मला काहीतरी वेगळं करायचं होतं, असे कमेंटमध्ये राखीने उत्तर दिले आहे. राखी सावंत सध्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असल्याचे बघायला मिळत आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. पती आदिल खानला तुरुंगात टाकल्यावर राखीने दुबईत तिची डान्स अकॅडमी सुरू केली आहे.

Exit mobile version